रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट

कमेंट करणाऱ्या तिघांची पुणे पोलिसांकडून चौकशी; सायबर पोलिसांनी केले मोबाइल जप्त

    07-Dec-2023
Total Views |
 
ru
 
पुणे, 6 डिसेंबर (आ.प्र.) :
 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सायबर पोलिसांनी तिघांचे मोबाइल जप्त केले आहेत. जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (वय 34, रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) असे चौकशीला बोलाविण्यात आलेल्याची नावे आहेत. पाटील, खुळे आणि कणसे यांचे मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी रूपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर विकास सावंत, जयंत पाटील, रंजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील या फेसबुक खात्यावरून अश्लील कमेंट करण्यात आली.
 
यानंतर तांत्रिक माहितीद्वारे रंजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील हे खाते सांभाळणाऱ्या संशयित लोकांचे मोबाइल नंबरची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. जयंत पाटीलला सीआरपीसीप्रमाणे नोटीस देऊन जबाब नोंदविण्यात आला असून, त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला. तसेच वसंत खुळे याचाही मोबाइल जप्त करण्यात आला. प्रदीप कणसे यानेसुद्धा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर बदनामीकारक पोस्ट केली असून, यालासुद्धा नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपेपाट ील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, पोलिस अंमलदार संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनेने, उमा पालवे यांच्या पथकाने केली.
 
सोशल मीडियावर महिलांसंदर्भात बदनामीकारक, अश्लील लिहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारे कोणी कमेंट, बदनामीकारक मजूकर लिहीत असेल, तर तक्रार करण्यासाठी महिलांनी पुढे यायला हवं.
                                                                                                                  -रामनाथ पोकळे (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे)