मुलांना खेळायला न पाठविण्याची चूक करू नका

06 Dec 2023 00:28:45
 

child 
 
आपल्या मुलांनी फक्त अभ्यासच केला पाहिजे अशी अनेक पालकांची समजूत असते. अभ्यास साेडून खेळायला जाणाऱ्या मुलांवर रागावणारे अनेक पालक आजुबाजूला आढळतात.खेळायला गेल्यामुळे मुलाला किती ायदे हाेऊ शकतात हे आपल्यापैकी अनेकांना माहितीच नसते. दरराेज खेळायला जाणाऱ्या मुलांचा मेंदू उत्तम रीतीने काम करत असताे, असे एका वैद्यकीय संशाेधनात आढळून आले आहे. नियमित खेळल्यामुळे मुलाच्या मेंदूला हाेणाऱ्या रक्त पुरवठ्यात माेठी वाढ हाेते, असे संशाेधकांचे मत आहे.
मुलांच्या आहारात जंक ूडचा माेठ्या प्रमाणात समावेश असताे. या जंक ूडचे पचन हाेण्यासाठी भरपूर व्यायाम करणे अथवा खेळणे हाच पर्याय असताे.सध्या अनेक मुले अवाजवी जाडी झालेली दिसतात. याचे कारण भरपूर खाणारी मुले सतत टीव्हीपुढे बसलेली दिसून येतात.
 
ज्या मुलांना व्यायाम करायचा कंटाळा येताे अशांना खेळण हा चांगला पर्याय आहे. मुलांना खेळू न देण्यात पालकलाेकच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुलांना खेळायची सवय असेल तर त्यांच शरीरतंदुरुस्त राहते आणि त्याचा ायदा त्यांना माेठं झाल्यावर हाेताे. तंदुरुस्त शरीराबराेबरच मुलाचं मानसिक आराेग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी नियमित खेळले पाहिजे . मुलांना खेळण्याची सवय लावल्यामुळे पालकलाेक मुलाला जीवनातील अनेक धडे सहजपणे शिकवू शकतात. खिलाडूवृत्ती तयार करणे, पराभव पचवण्याची तयारी ठेवणे, सहकाऱ्यांच्या मताचा, भावनांचा आदर करणे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे असे उपयुक्त ठरू शकणारे अनेक धडे आपण मुलांना देऊ शकताे. त्याचबराेबर ट्रेकिंग, पाेहणे, सायकलिंग अशा माध्यमातूनही मुलांना िफट ठेवता येऊ शकते. राज्य तसेच केंद्र सरकारच्या नाेकऱ्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील खेळाडूंसाठी राखीव जागा असतात, हेही विसरून चालणार नाही.
 
Powered By Sangraha 9.0