इतरांबद्दल सहानुभूती बाळगा; त्यांना मदत करा

05 Dec 2023 00:30:56
 
 

health
अनेकदा आपल्या राेजच्या जगण्यात अशा घटना घडतात की त्या वेळेस आपला ताेल जाताे, आणि समाेरच्या माणसाचं म्हणणं ऐकून न घेता आपण त्याला वाट्टेल ते बाेलायला सुरूवात करताे. ते ऐकून ताे सुद्धा आपल्याला बाेलायला सुरुवात करताे. याचं पर्यवसान अनकेदा खूप माेठ्या गैरसमजात हाेतं. म्हणून दुस-याच्या जागी आपण स्वत: जाऊन नेहमी परिस्थिती जर ओळखून वागलात तर तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येणार नाही.वादविवाद संपवण्यासाठी जर तुम्ही एखाद्या जादूच्या शब्दाचा शाेध घेत असाल तर जे शब्द वाद संपवतील आणि समाेरचा माणूस काय सांगत आहे हे ऐकून घेण्याची ताकद जर तुम्हांला मिळाली तर तर ते वाक्य म्हणजे ‘‘जे काही झालं आहे त्यात तुमचा काही दाेष नाही. तुमच्या जागी जर मी असताे किंवा असते तर मी सुध्दा हेच केलं असतं.’’ तुमच्या अशा बाेलण्यामुळे समाेरचा माणूस सुद्धा एकदम शांत हाेऊन जाईल.
आणि यामुळे तुमच्यातील वाद विवाद संपवून समाेरचा माणूस सुद्धा तुमच्याप्रती सहानुभूती बाळगेल. अनेकदा आपल्या राेजच्या जगण्यात अशा घटना घडतात की त्या वेळेस आपला ताेल जाताे, आणि समाेरच्या माणसाचं म्हणणं ऐकून न घेता आपण त्याला वाट्टेल ते बाेलायला सुरूवात करताे. ते ऐकून ताे सुद्धा आपल्याला बाेलायला सुरुवात करताे. याचं पर्यवसान अनकेदा खूप माेठ्या गैरसमजात हाेतं. म्हणून दुस-याच्या जागी आपण स्वत: जाऊन नेहमी परिस्थिती जर ओळखून वागलात तर तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येणार नाही. जे झालं ते झालं असं म्हणून माझ्यावर देवाची कृपा झाली की माझ्यासाेबत असं घडलं नाही त्याबाबत कृतज्ञता बाळगा. तेव्हा नक्कीच तुमच्या मनात दुस-याबद्दल सहानुभूती निर्माण हाेईल.
तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या लाेकांना भेटता त्यांपैकी 3/4 लाेक सहानुभूतीचे भुकेले आहेत, हे लक्षात घ्या. जर तुम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली तर ते तुमच्यावर प्रेम करू लागतील. केवळ तुम्ही आम्हीच नाहीतर संपूर्ण मानवजात सहानुभूती मिळावी म्हणून प्रयत्नशील असते. लहान मूल त्याला इजा झाल्यावर ती इतरांनी पहावी आणि त्याचं सात्वंन करावं अशा अपेक्षेत असतं. हेच माेठ्याचं सुद्धा असतं.ते सतत आपल्याला काय हाेतं आहे, आणि आपल्याला काय दु:ख आहे हे सांगत राहतात. अनेकदा दु:ख हे वास्तव असतं तर अनेकदा काल्पनिक दु:खामुळे सुद्धा लाेक हैराण हाेतात. जर तुम्हांला दयेचा आपल्या आयुष्यात परिचय व्हावा असं वाटत असेल तर इतरांप्रती नेहमी सहानुभूती बाळगा.
\
 
Powered By Sangraha 9.0