काैतुकाचे आणि प्रशंसेचे बाेल आपल्या किशाेरवयीन मुलीला किती आनंदी, सुस्वभावी आणि चारित्र्यवान बनवू शकते हे जर प्रत्येक आईने ध्यानात घेतले तर आपल्या कुटुंबाचे चित्रच पालटून जाईल. नेहमी गाेड, सुमधुर बाेलणारी आपली मुलगी कधीही कर्कशा हाेणार नाही. जर तिला लहानपणापासूनच ती सुरक्षित असल्याची जाणीव दिली तर तिचे वागणे, बाेलणे अजिबात बिघडू शकणार नाही.मुलीलाही मुलाइतकीच प्रेम आणि आपुलकी हवी असते. मुलीचे भावी जीवन सुखमय करण्यासाठी सर्वांत आवश्यकता असते ती तिचा आत्मविश्वास जागवण्याची. मुलीत ताे जागा करण्यासाठी वा तिला ताे मिळवून देण्यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही. ताे तर एक भावनिक दृष्टिकाेन आहे, व्यवहार आहे ज्याचा संबंध तिच्या वैयक्तिक कामाशी आणि व्यवहाराशी असताे. जर एखादी तरुणी वा किशाेरी इतरांच्या भावनांचा मान राखत आपल्या व्यक्तिमत्व विकासात सक्रिय राहात असेल तर नक्कीच तिचे मनाेबल उंचावेल.तिच्या विचारात माधुर्य आणि परिपक्वता येईल.
ती सामाजिक व काैटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजू लागेल. जीवनात अनेक हादरे बसू शकतात. बऱ्याचदा अपमानास्पद स्थितीला सामाेरे जावे लागते. कधी कधी प्रियजनांचा विरहही सहन करावा लागताे.अशा विषम परिस्थिती विसरण्याची शिकवण देणेच उत्तम असते. जीवनात सुख-दु:ख हातात हात घालून वावरत असतात पण दु:खात न घाबरणे आणि सुखात सामान्य राहाणे हेच जीवन आहे. मुलगी पर्नयाचे धन असते. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्यामध्ये सर्वांगीण गुणांचा विकास करावा जेणेकरून सासरी जाण्यात व नव्या कुटुंबात एकरूप हाेण्यात तिला अजिबात गैरसाेयीचे हाेणार नाही.आज सासरचे लाेकही तिच्याकडून दुहेरी जबाबदारीची अपेक्षा बाळगत असतात.आज एकाने कमावून बाकीच्यांनी बसून खाण्याचा काळ मागे पडला आहे.आज साऱ्यांनाच कमवावे लागत आहे.यासाठी आजच्या किशाेरींमध्ये धैर्य असणे खूपच गरजेचे आहे. हे सारे तेव्हाच जमू शकते जेव्हा मुलीच्या कानावर वेळाेवेळी काैतुकाचे आणि प्रशंसेचे बाेल कानावर पडत राहतील. तिचा आत्मविश्वास वाढवला जाईल.