आराेग्यासाठी दूध चांगले, तरी त्याचे सेवन काळजीपूर्वकच हवे

    04-Dec-2023
Total Views |
 
 

Milk 
 
उत्तम आराेग्यासाठी पाैष्टिक आहार आवश्यक असताे. दूध हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. नवजात अर्भकाचा पहिला आहार म्हणजे दूधच असते. मानवाच्या विकासात दुधाची भूमिका माेलाची असून, त्याला पूर्णान्न म्हटले जाते. नियमितपणाने दूध पिणारे अनेक लाेक आपल्या सभाेवताली दिसतील.भारतात दुग्धपानाची सवय प्राचीन असून, सध्याच्या काळातही ‘राष्ट्रीय दुग्ध दिवस’ पाळला जाताे.देशातील ‘श्वेत क्रांती’चे जनक डाॅ. व्हर्गिस कुरियन यांच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जाताे.आराेग्याला चांगले असले, तरी वाटेल तेव्हा आणि हवे तेवढे दूध पिऊन चालत नाही. त्याबाबत काय नियम पाळावेत आणि काय खबरदारी घ्यावी ते पाहा.
 
पारंपरिक ज्ञान : आयुर्वेदानुसार दूध सात्त्विक आणि पाेषण करणारे आहे. वात, पित्त आणि कफ या त्रिदाेषांवर त्याचा परिणाम हाेताे. गाईचे दूध सर्वांत जास्त सात्त्विक मानले जाते. दूध शीतप्रवृत्तीचे असले, तरी काहींना त्यामुळे पचनाची समस्या येऊ शकते. त्यामुळे दुधाचे सेवन सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे याेग्य.
 
याेग्य वेळ : दुधाचे सेवन सकाळी किंवा सायंकाळी करता येते. सकाळी गरम दूध प्यायल्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा लाभते आणि रात्री झाेपण्यापूर्वी घेतलेल्या काेमट दुधामुळे शांत वाटून झाेपेची गुणवत्ताही सुधारते. व्यायामानंतर दूध घेतल्यामुळे स्नायूंची झीज भरून येते. मात्र, जेवणानंतर लगेच दूध पिणे टाळावे.
 
याेग्य प्रमाण : वय, प्रकृती (आराेग्य) आणि गरजेनुसार दुधाच्या सेवनाचे प्रमाण ठरते.अर्भकांसाठी स्तनपान आणि नुकत्याच चालायला लागलेल्या लहान बाळांसाठी दिवसभरात दाेन ते तीन कप दूध याेग्य ठरते. अर्थात, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याचे प्रमाण ठरवावे. मध्यम वयात 25 टक्क पाणी मिसळून, तर म्हातारपणात निम्मे पाणी मिसळून दूध पिण्याची शिफारस केली जाते.
पण, त्यासाठीसुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय करावा.
 
दुधाबराेबर हे टाळा : दुधाबराेबर काेणते पदार्थ- पेये घ्यावीत आणि काेणती टाळावीत याबाबत आयुर्वेदाने माहिती दिली आहे. आंबट फळे, मासे अथवा खारट पदार्थ दुधाबराेबर खाऊ नयेत.दुधाबराेबर या पदार्थांची प्रक्रिया हाेऊन पचनाला त्यामुळे त्रास हाेताे. दुधातील गाेडपणाचा आंबट फळांतील अ‍ॅसिड्सवर परिणाम हाेताे. मासे आणि दूध एकत्र घेऊ नये. खारट पदार्थांमुळे पाेटातील पीएचचे संतुलन बिघडते. त्यामुळे दुधाबराेबर असे पदार्थ खाऊ नयेत, असा आयुर्वेदाचा सल्ला आहे.
 
दूध काेणी टाळावे? : दुधात पाैष्टिक घटक भरपूर असले, तरी काही लाेकांसाठी त्याचे सेवन करणे हितावह असते. लॅ्नटाेस इनटाॅलरन्स, दुधाची अ‍ॅलर्जी, सरश्ररलीेींशाळर अथवा हिशपूश्रज्ञशीेंर्पीीळर सारख्या वैद्यकीय समस्या असलेल्यांनी दुधाला पर्यायी पेये घ्यावीत. ही समस्या असलेल्या अर्भकांसाठी मातेचे दूध हा सर्वाेत्तम पर्याय असताे.
 
व्हेगनांच्या गरजा : कट्टर शाकाहारी असलेल्यांना व्हेगन म्हणतात आणि ते दूधही घेत नाहीत. अशा लाेकांनी वनस्पतीजन्य दूध, माेठ्या पानांच्या भाज्या, नट्स, बिया आणि सप्लिमेंट्सद्वारे दुधाची गरज भागवावी. मात्र, पाैष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे अशा लाेकांच्या हाडांचे आराेग्य, राेगप्रतिकारशक्ती आणि सर्वसाधारण आराेग्यावर परिणाम हाेऊ शकताे.दुधाचे विविध पर्याय : गाईच्या दुधाशिवाय आयुर्वे दाने अन्य पर्यायही सांगितले असून, त्यात शेळीच्या दुधाचा समावेश आहे. हे दूध सहज पचते. मेंढीच्या दुधात कॅल्शियम आणि अन्य पाैष्टिक घटक भरपूर असतात, तर उंटिणीच्या दुधात फॅट्स आणि काेलेस्ट्राॅल कमी असते. मलईदार थरासाठी म्हशीचे दूध प्रसिद्ध आहे. उच्च फॅट आणि प्रथिनांच्या जास्त प्रमाणामुळे हिमालयाच्या उंच भागांत याकचे दूध सेवन केले जाते.