गुणवत्तापूर्ण कामाची आस बाळगणे, यात वरकरणी पाहता काही गैर नाही; पण कधीकधी या ‘चांगलेच झाले पाहिजे’ याचे इतके दडपण आपण घेताे की, आपणच आपल्यासाठी कैद तयार करण्यासारखे हाेते. चांगलेच झाले पाहिजे, परफेक्ट झालेच पाहिजे, या हव्यासापाेटी काही माणसे अक्षरश: काम करणेच साेडून देतात, निष्क्रिय हाेतात.खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या उ्नतीप्रमाणे ते आळशी बनत जातात.नाहीतर काही लाेक चांगलेच झाले पाहिजे, याचा काच सहन न झाल्याने निराश हाेतात.त्यांना स्वत:च्या क्षमतांवर शंका येऊ लागतेआपण लायक नाही, असे उदास विचार त्यांच्याभाेवती घिरट्या घालू लागतात.थाेडक्यात, मी नेहमीच चांगले केले पाहिजे, या विचाराचा अट्टहास तुम्हाला मागे खेचताे. असे म्हणतात, दुसऱ्याला विचारण्यासाठी आपल्याकडे भरमसाठ प्रश्न असतात; पण आपण स्वत:ला मात्र ्नवचित प्रश्न विचारताे.त्याचप्रमाणे मी दुसऱ्याला माझ्या मनाप्रमाणे वागवीन; पण दुसऱ्यांनी मात्र मला कायम चांगले आणि आदराने वागवले पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. आपल्या विचारांमध्ये किती विराेधाभास आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही.
दुसऱ्याचे वागणे माझ्या हातात नाही, ही साधी गाेष्ट आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे आपण मागे खेचले जाताे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला जाता तेव्हा दरवेळी पीच तुमच्या साेयीची कशी असेल किंबहुना ती कधीचनसते. त्यामुळे तुम्हाला ती तुमच्या साेयीची करून घ्यावी लागते. कशी फलंदाजी करावी लागणार आहे किंवा कसे खेळावे लागणारे याची रणनीती पीच पाहूनच तुम्ही ठरवता ना. ताेच नियम जगण्यालादेखील लागू आहे.तुम्हाला पाहिजे तसे जग कधीच नसते.तुम्हाला जे साेपे वाटते ते दुसऱ्यासाठी खूप कठीण असू शकते हा नियम आहे; पण आपण मला परीक्षेसाठी साेपाच पेपर पाहिजे किंवा माझा ज्या विषयाचा अभ्यास झाला आहे त्याचेच प्रश्न विचारा, असे म्हणू लागू तर आपल्या जगण्यालाच काही अर्थ राहणार नाही.संघर्ष हा अटळ आहे. तुम्ही साेपेपणाची वाट बघत बसाल, तर आपाेआपच मागे पडाल.