सुखदु:खाकडे समभावाने पाहणे आपल्यालाही श्नय

    09-Nov-2023
Total Views |
 
 


Balance
 
 
 
 
जीवनात सगळे अनुकूल घडत नाही.सुखाबराेबरच दु:खही अटळ असते. काहींच्या वाट्याला जास्त, तर काहींच्या वाट्याला कमी एवढाच फरक. याेगी माणसे याकडे समभावाने पाहतात. मनावर नियंत्रण असेल, तरच हा समभाव येताे आणि त्यासाठी शिस्त आवश्यक असते.आपल्या मनाला ती लावलीत, तर तुमच्या इच्छाही पूर्ण हाेऊ लागतात. आपल्या त्वचेला स्पर्शाच्या संवेदना जाणवत नाहीत. ताे अनुभव मेंदू घेत असताे. काेणतीही व्यक्ती मनाविना शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधाचा (वास) अनुभव घेऊ शकत नाही. जिभेमुळे चव कळत असल्याचे आपल्याला वाटत असले, तरी प्रत्यक्षात मेंदू तिचा अनुभव घेत असताे. त्याचप्रमाणे शरीराच्या काेणत्याही अवयवाला जखम हाेते तेव्हा वास्तवात पीडा त्या अवयवाऐवजी मनाला हाेते.
 
पीडेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याकडे मज्जासंस्था आणि मेंदूतील ‘धूसर द्रव्य’ ही दाेन साधने आहेत. पण, या दाेन्हींतील संपर्काची परवानगी मन देते तेव्हाच आपल्याला त्याची जाणीव हाेते. आपल्याला काही पीडा असल्याचे मन सांगत नाही ताेपर्यंत काेणताही त्रास हाेत नाही.भारतातील महान ऋषी-मुनींनी लावलेला हा अद्भुत शाेध आहे. रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ्नलाेराेफाॅर्मच्या प्रभावामुळे आपल्याला काेणताही त्रास जाणवत नाही. संवेदना मनापर्यंत न पाेहाेचणे हे त्याचे कारण. मज्जातंतूंच्या अंतिम टाेकाला सूक्ष्म तंतू असतात आणि त्याद्वारे पीडेची संवेदना मेंदूपर्यंत पाेहाेचविली जाते. हे संकेत पुढे जाणे ्नलाेराेफाॅर्ममुळे राेखले जाते. मेंदू म्हणजे मनाचे एक संवेदनशील उपकरण आहे आणि शरीरातील सगळ्या संवेदना मज्जातंतू तसेच मेंदूद्वारे मनापर्यंत पाेहाेचविल्या जातात. मेंदूबराेबर तादात्म्य ठेवून मन या संवेदना ग्रहण करते आणि त्यातून अर्थ शाेधते.
 
शक्तिशाली आणि सकारात्मक विचारांच्या अभ्यासाने सशक्त झालेले मन सुख आणि दु:खाच्या संवेदनांमुळे कमी प्रभावित हाेते. आपल्याला धडा देण्यासाठी ईश्वराने केलेली याेजना, असा अर्थ मन काढते. केवळ आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी माणसाला संवेदनशीलता दिली गेली हाेती. संवेदनशीलतेच्या अभावी एखाद्या व्यक्तीने स्वत:ला वाईट पद्धतीने जखम करून घेतली तरी त्याला त्याची जाणीव हाेणार नाही.पीडा देण्यासाठी संवेदनशीलता नव्हती.पशूंमध्ये मानवाएवढी ही क्षमता विकसित झालेली नसल्याने त्यांना पीडेचा अनुभव कमी येताे. तसे नसते, तर पशूंची हत्या करण्यासाठीच्या काही पद्धतींमधील क्राैर्य असहनीय झाले असते.
खाण्यासाठीच्या सागरी झिंग्यांना ते जीवंत असतानाच उकळत्या पाण्यात टाकले जाते.सुख आणि दु:खाची उत्पत्ती मनच करत असल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याच्या अभ्यासातून शारीरिक पीडेचा अनुभव कमी करता येऊ शकताे.
 
श्रीमद्भगवद्गीता याची सखाेल व्याख्या करते आणि सुख-दु:खाबाबत असंवेदनशीलता त्याचा प्रभाव आणखी वाढविते, पण नियंत्रित संवेदनशीलतेमुळे व्यक्तीला पीडेचा अनुभव कमी येताे असे सांगते.त्यामुळे ती व्यक्ती इंद्रिय-सुखांचा दास राहणे कमी हाेते. मी माझ्या मन आणि शरीराला कमी संवेदनशील हाेण्यासाठी प्रशिक्षित केले आहे आणि त्यामुळे इंद्रियांच्या बाधेपासून मी स्वत:ला मुक्त अनुभविताे. मुक्ती मिळविण्यासाठी अशाच प्रशिक्षणाची आवश्यकता असते. शरीरातील विविध संवेदनांवर गुलामाप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करण्यामुळे मन आणि आत्मा अशा दाेघांमध्ये अशांती निर्माण हाेते. आत्म्याच्या अशांतीमुळे माणूस आपले वास्तविक स्वरूप, शांती गमावताे. पृथ्वीवरील सर्वांत उष्ण आणि सर्वांत थंड ठिकाणीही ईश्वर आहे. ताे उत्तर ध्रुवावर आहे आणि आफ्रिकेतील वाळवंटातसुद्धा. ताे त्याची सृष्टी असलेल्या पृथ्वीच्या काेणत्याही चरमावस्थेने प्रभावित हाेत नाही. आपण मानव म्हणजे परमेश्वराचे प्रतिबिंब असल्याने त्याच्यासारखेच वागले पाहिजे.उन्हाळा-थंडी आणि सुख-दु:खाचा सामना कराव्या लागणाऱ्या शरीरात त्याने आपल्याला ठेवले आहे.मात्र, आपण या द्वंद्वाकडे समदृष्टीने पाहावे अशी त्याची इच्छा आहे. उतावीळपणा न करता आपण आपली सहनशक्ती विकसित केली पाहिजे.