भगवान विष्णूंना शंख आणि शंखनाद प्रिय आहे.प्राचीन काळात शंख वाजवूनच सकाळी युद्धाला सुरुवात हाेत असे व सूर्यास्तानंतर युद्ध थांबत असे; पण भगवान विष्णूचे मुख्य धाम असलेल्या बद्रीनाथ मंदिरात शंखनाद करीत नाहीत.सामान्यपणे देवपूजा झाल्यावर मठ मंदिरात शंख नाद करण्याची प्राचीन परंपरा आहे; परंतु हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या बद्रीनाथ मंदिरात शंखनाद करीत नाहीत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. हिवाळ्यात बद्रीनाथ धाम बर्फाच्छादित असताे.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, विशिष्टवारंवारितेमुळे निर्माण हाेणारा आवाज पर्यावरणाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान करताे.या स्थितीत डाेंगराळ भागात भूस्खलनसुद्धा हाेऊ शकते. यामुळे या भागातील मंदिरात प्राचीन काळापासून शंखनाद करीत नाहीत. शंख न वाजवण्यामागे एक धार्मिक मान्यता आहे.
शास्त्रानुसार एक वेळ लक्ष्मी देवी बद्रीधाममधील तुलसी भवनमध्ये ध्यान करीत असताना भगवान विष्णूंनी शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला हाेता. त्या काळात युद्धात विजय मिळाला की शंखनाद करीत असतं; परंतु भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवी ध्यानस्थ असल्याचे पाहून त्यांचा ध्यान भंग हाेऊ नये म्हणून शंखनाद केला नाही.यामुळे बद्रीनाथमध्ये शंखनाद करीत नाहीत.आणखी एक आख्यायिका अशी प्रचलित आहे की, अगस्ती ऋषी केदारनाथमध्ये राक्षसांचा संहार करीत असताना अतापी व प्रतापी नावाचे दाेन राक्षस पळून गेले. त्यानंतर अतापी आपला जीव वाचविण्यासाठी मंदाकिनी नदीत शंखामध्ये लपून बसला. असे मानतात की या भागात काेणी शंखनाद केला, तर शंखात लपलेला अतापी राक्षस बाहेर येऊन पळून जाईल. त्यामुळे बद्रीनाथ मंदिरात शंखनाद न करण्याची प्रथा सुरू झाली.