दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांकडून सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    06-Nov-2023
Total Views |
 
 

govenor 
 
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली. देशाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रगतीत भ्रष्टाचार हा माेठा अडथळा आहे.भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी लाच न घेण्याची तसेच न लाच देण्याची, व्यापक समाजहितासाठी कार्य करण्याची शपथ राज्यपालांनी उपस्थितांना दिली.राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी उपस्थितांसमाेर राज्यपालांच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले. राज्यात 30 ऑक्टाेबर ते 5 नाेव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ ही संकल्पना त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.