पडद्यावरच्या थरारामागची मेहनत

    06-Nov-2023
Total Views |
 
 
 

films 
 
जे घटक प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणतात, त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अ‍ॅक्शनदृश्यं. ती अतिशय थरारक असतात. उत्तम प्रकारे चित्रित झालेली असतील तर ती प्रेक्षकांना श्वास राेखून धरायला लावतात. सिनेमातली अ‍ॅक्शन काही खरी नसते, एक माणूस 10 जणांना लाेळवू शकत नाही, प्रत्यक्ष मारामारीत एका माणसावर एकेक जण धावून जात नाही, सगळे मिळून तुटून पडतात, हे सगळं आपल्याला माहिती असतं, तरीही आपला सिनेमातल्या अ‍ॅक्शनवर विश्वास बसताे. ताे बसवणं हेच तर त्यामागच्या कलावंतांचं आणि तंत्रज्ञांचं काम असतं. त्यासाठी काय केलं जातं, हे सांगणाऱ्या या गंमती. अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमांमध्ये रस्त्यावरचे पाठलाग हा एक महत्त्वाचा घटक असताे. अतिशय वेगाने धावणाऱ्या माेटरसायकलीची दृश्यं पाहताना प्रश्न पडताे की कॅमेरा इतका अचूक कसा समाेर असताे, मध्येच कॅमेऱ्याचं वाहन थांबलं तर नायकाची बाइक त्याच्यावर धडकत कशी नाही? इथला फाेटाे पाहिल्यावर कळतं की हे सगळं यांत्रिक पद्धतीने केलं जातं आणि कमी वेगात चित्रिकरण करून ते अधिक वेगाचं दाखवलं जातं. दुसरीकडे रेल्वेच्या खाली चिरडली जाणारी कार दिसते आहे. असं दृश्य काही मूळ आकाराची वाहनं वापरून चित्रित हाेऊ शकत नाही. त्यासाठी रिअल लाइफ माॅडेल बनवून त्याचं चित्रीकरण केलं जातं.