तरुण दिसण्यासाठी विविध थेरपींचा वाढता वापर

    06-Nov-2023
Total Views |
 
 


Therapy
 
 
बालपण-तारुण्य-प्राैढावस्था आणि वृद्धत्व... या सर्व सजीवांच्या आयुष्यातील अटळ अवस्था आहेत. यातील तारुण्याचा काळ सर्वांत बहरीचा; पण ते कायम टिकणारे नसल्याने वृद्धावस्था येणारच. आपण तरुण दिसावे-राहावे यासाठी माणसाचे पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध लेप, औषधांचा वापर केला जात हाेता आणि सध्याच्या वैज्ञानिक युगात त्याला नव्या प्रयाेग आणि संशाेधनांची जाेड लाभली आहे.पूर्वीच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’ काळात मेकअप आणि उटणे हे हिराे हाेते आणि आजच्या ‘अँटी-एजिंग’च्या रंगीत काळातील हिराे आहेत सीरम, लेसर थेरपी आणि मायक्राेनिडलिंगसहित आधुनिक तंत्रज्ञान. त्याचे नाव घेणेसुद्धा कठीण आणि त्याचा खर्च न पेलणारा.
वय कमी करण्याची म्हणजे ‘रिव्हर्स एजिंग’ची इच्छा आता एवढी तीव्र झाली आहे, की माणसाला चिरतरुण ठेवण्याचे उपाय शाेधण्यासाठी शास्त्रज्ञांची पथके कामाला लागली आहेत.वय वाढण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी पूर्वी आराेग्यदायी आहार आणि काही उपचारांबराेबरच त्वचेची काळजी घेण्याचे उपाय केले जात हाेते. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसेच्युसेट्स इन्टिट्यूट ऑफ टे्ननाॅलाॅजी या संस्थांतील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, त्यांनी औषधांचे असे एक मिश्रण (काॅकटेल) तयार केले आहे, की त्यामुळे वाढते वय काहीकाळ राेखलेच जात नाही; तर जुन्या त्वचेतही नवे प्राण फुंकता येतील.
‘फाउंटन ऑफ यूथ’ असा उल्लेख केला जात असलेल्या या केमिकल काॅकटेलमध्ये ग्राेथ हार्माेन, अँटिडायबेटिक एजंट मेटफाॅर्मिन आणि एएमपीके एन्झाइम यांना सक्रिय करणारे एक रसायन असून, त्यामुळे वयाचे चक्र मागे जाण्यास मदत हाेईल. म्हणजेच आगामी काळात तरुण दिसण्याची इच्छा हे स्वप्न राहणार नाही. फ्नत तुमचा खिसा भरलेला हवा. तारुण्य काहीकाळ टिकवून ठेवणारे ‘बाेटाॅ्नस’ हे इंजे्नशन सुमारे 30 वर्षांपूर्वी आले.तरुण दिसण्याची इच्छा केवळ महिलांमध्येच नाही, तर पुरुषांमध्येही वाढते आहे. अमेरिकेतील 45 वर्षीय उद्याेजक ब्रायन जाॅन्सन यांचे उदारण पाहा. आपण कायम तरुण राहावे, यासाठी ते वर्षाला 16 काेटी रुपयांपेक्षा जास्त र्नकम खर्च करतात.त्यांच्या किशाेरवयीन मुलाच्या र्नतातील प्लाझ्माही त्यांनी घेतला असून, त्यामुळे आपण किमान पाच वर्षांनी तरुण झाल्याचा ब्रायन यांचा दावा आहे.
तरुण राहण्याची वाढती इच्छा: बाॅलिवूडमधील काही अभिनेत्री-अभिनेत्यांकडे पाहून काेणाला त्यांच्या वयाचा अंदाज करता येणार नाही. मग त्या रेखा किंवा संगीता बिजलानी असाेत किंवा अनिल कपूर. या अभिनेत्यांनी वयाची साठ वर्षे ओलांडल्याचे काेणी म्हणू शकणार नाही.त्यांच्याकडे पाहून सर्वसामान्यांनाही आपण तरुण दिसावे, असे वाटायला लागले. त्यातून ‘अँटी-एजिंग’ची जागतिक बाजारपेठ वाढत असून, या बाजारपेठेतील उलाढाल गेल्या वर्षी 63.01 अब्ज डाॅलर हाेती आणि 2030पर्यंत ती सुमारे 106 अब्ज डाॅलरवर पाेहाेचण्याचा ‘वांटेज मार्केट रिसर्च’चा अंदाज आहे.
वय घटविण्याचे नवीन उपाय: शारीरिक घटकांवर परिणाम करून तारुण्य टिकविण्याबाबत सध्या शास्त्रज्ञ काम करत आहेत. ‘पीएलएलए’ आणि ‘पीडीआरएन’ हे या प्रयत्नांचा भाग असून, ‘अँटी-एजिंग’च्या जगातील हे सर्वांत नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. ‘पाॅली-एल लॅ्निटक अ‍ॅसिड’ म्हणजे ‘पीएलएलए’ हे एकप्रकारचे रसायन असून, गरज असेल तेथे ते त्वचेत इंजे्नशनद्वारे पाेहचविले जाते. त्वचेत असलेल्या ‘काेलेजन’ या घटकाला नव्या काेशिका तयार करण्यास हे रसायन उत्तेजन देते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या जातात. ‘पीडीआरएन’ हे एकप्रकारे संदेशवाहकाचे काम करते आणि मायक्राेनिडलिंग तंत्रज्ञानाद्वारे ते त्वचेत खाेलवर पाेहाेचविता येते.
साेशल मीडियावरील विचित्र सल्ले: साैंदर्य आणि तारुण्य टिकविण्यासाठी साेशल मीडियावर विचित्र सल्ले दिले जातात. आपली मान झुकवू नका, खूप हसू नका, शिजवलेले अन्न खाऊ नका, आपल्या चेहऱ्यावरील स्नायू हलवत राहा, अमूक सीरम किंवा क्रिम लावा वगैरे. साेशल मीडियाच्या विविध प्लॅटफाॅर्म्सवर अशा सल्ल्यांचा महापूर पाहायला मिळताे. आपण कायम तरुण राहावे, ही त्यामागील इच्छा असते.सध्याच्या काळात साेशल मीडियावर ‘अँटीएजिंग’बाबत विविध सल्ल्यांच्या पाेस्ट्स येत आहेत. त्या वाचल्यावर आपले वय वाढणे म्हणजे काही गुन्हा असल्यासारखे वाटते.14-15 वर्षांच्या मुलीसुद्धा वय वाढण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी आपली दिनचर्या आणि फेशियल याेग यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. या दाव्यांमध्ये किती तथ्य असेल हे सांगणे श्नय नाही; पण अशा पाेस्ट्सना मिळणारे लाइ्नस पाहता, प्रत्येकाला कायम तरुण राहण्याचा जादुई उपाय हवा असल्याचे स्पष्ट दिसते.
झेनिथ स्किन हेअर अँड डेंटल सेंटरमधील त्वचाविकारतज्ज्ञ (डर्माेटाेलाॅजिस्ट) डाॅ.विजय सिंघल म्हणाले, ‘अँटी-एजिंगच्या क्षेत्रात बाेटाे्नस हे बरेच जुने तंत्रज्ञान असून, आजही त्याला मागणी आहे. नव्या तंत्रज्ञानाचा विचार केल्यास त्यात पीआरपीसह ग्राेथ फॅ्नटर काॅन्सनट्रेट म्हणजे जीएफसी यांचा स्वीकारही लाेक करत आहेत. त्वचा आणि केसांमध्ये नवा प्राण आणणारे हे तंत्रज्ञान आहे. मात्र, या उपचारांबराेबरच आराेग्यपूर्ण जीवनशैलीसुद्धा गरजेची असते.’ आल्प्स ब्यूटी साेल्यूशन्समधील साैंदर्यतज्ज्ञ गुंजन तनेजा यांच्या मते, पूर्वीपेक्षा लाेक आतस्वत:कडे जास्त लक्ष देत असून, तारुण्य टिकविण्याची इच्छा त्यामागे आहे. सध्याचे तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा सुलभ आणि जास्त प्रभावी आहे. उदा. काॅपर पेपटाइड्स. हे फेशियल थ्रेड्स असतात आणि ते सुरकुत्या घालवतात.
मिसाे थेरपी असाच एक उपचार असून, यात इंजे्नशनद्वारे त्वचेत हार्माेन्स, एन्झाइम्स आणि जीवनसत्त्वे टाकली जातात. त्यामुळे त्वचा घट्ट हाेऊन ती नवी दिसायला लागते.
वेगळ्या प्रकारची थेरपी: ‘अँटी-एजिंग’च्या क्षेत्रात ‘हायपरबेरिक ऑ्निसजन थेरपी’ ही एक वेगळी थेरपी आहे. यात उच्च दाबाच्या ऑ्निसजनच्या खाेलीत माणसाला ठेवून ऑ्निसजन लाल र्नतपेशींपर्यंत पाेहाेचेल एवढा दाब दिला जाताे. त्यामुळे जुन्या आणि खराब झालेल्या पेशी ठीक हाेतात आणि नव्या पेशी निर्माण हाेऊ लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी लाखाे रुपये खर्च करून लाेक आता हा उपचार करून घेतात. ब्रिटिश लेखिका एलिस स्मेली यांनी विंचेस्टरमध्ये सहा आठवडे ही थेरपी घेण्यासाठी 16 लाख रुपये खर्च केला.