श्राईकाेटी माता मंदिरात पती-पत्नीने दर्शन घेण्यास मनाइ

    06-Nov-2023
Total Views |
 
 
 

Temple
 
 
 
साधारणपणे विवाह झाल्यावर नवविवाहित जाेडपे निरनिराळ्या मंदिरांत दर्शन घेण्यासाठी जातात.मंदिरात पूजा केल्यावर पती-पत्नी एकत्रच देवदर्शन घेतात; पण हिमाचल प्रदेशातील शिमला येथून जवळच असलेल्या रामपूर येथील श्राईकाेटी माता मंदिरात जाेडप्याने एकत्र दर्शन घेण्यास मनाई आहे.एखाद्या जाेडप्याने देवीचे एकत्र दर्शन घेतले, तर त्यांचे वैवाहिक जीवन टिकत नाही, अशी प्राचीन काळापासून मान्यता आहे. त्यामुळे पती-पत्नी या मंदिरात एकत्र दर्शन न घेता प्रथम पती दर्शन घेताे व नंतर पत्नी दर्शन घेते.
भगवान शंकराची अर्धांगिनी पार्वतीने दिलेला शाप या प्रथेला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा भगवान शंकरांनी त्यांचे दाेन्ही पुत्र कार्तिकेय व गणेश यांना ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून या, असे सांगितले.
 
कार्तिकेय वडिलांच्या आज्ञेनुसार ब्रह्मांड प्रदक्षिणा करण्यासाठी माेरावर बसून निघून गेला; पण गणेशाने शंकर-पार्वती भाेवती प्रदक्षिणा घातली व ब्रह्मांडाची प्रदक्षिणा केल्याचा दावा केला. माझ्यासाठी माझआईवडीलच ब्रह्मांड आहे, असा त्याचा दावा हाेता.
कार्तिकेय मात्र ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून कैलासावर परत आला. ताेपर्यंत गणेशाचा रिद्धी व सिद्धी या दाेन बहिणींसाेबत विवाह झाला हाेता. त्यामुळे मी आजन्म अविवाहित राहीन, यापुढे स्त्रीचे ताेंड पाहणार नाही, असे म्हणून कार्तिकेय दक्षिण भारतात निघून गेला. यामुळे पार्वती रागावली व तिने शाप दिला, की काेणत्याही जाेडप्याचे दर्शन घेणार नाही. माझे जाेडप्याने दर्शन घेतले, तर त्या जाेडप्याचे वैवाहिक जीवन संपुष्टात येईल. तेव्हापासून लाेक या मंदिरात जाेडप्याने म्हणजे सपत्नीक दर्शन करीत नाहीत.