शाकाहारी आहारात निव्वळ प्राेटिन्सचं प्रमाण कमी असतंच असं नाही, तर त्यात अनेक आवश्यक पाैष्टिक घटक नसतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी खास बदल करावे लागतात.या संदर्भातला एक प्रबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. जर तुम्ही पक्के शाकाहारी असाल तर तुमच्या आहारातून तुम्हाला काही विशिष्ट पाैष्टिक घटक मिळण्याची शक्यता असते ज्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत दिसून येऊ शकतात. जर ही परिस्थिती निर्माण हाेऊ द्यायची नसेल तर काही गाेष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
लाेह अर्थात आयर्न: रक्तातील हिमाेग्लाेबिनचं प्रमाण कमी झालं तर अॅनामिक कंडिशन अर्थात अशक्तता, शक्तीचा ऱ्हास आणि कमालीचा अशक्तपणा हे दुष्परिणाम दिसून येतात.
काय कराल: मांस, चिकन आणि मासे, अंडी यात पुरेशा प्रमाणात आयर्न असतं; मात्र पक्क्या शाकाहारी व्यक्तीला वरील पदार्थात असणारं आयर्न मिळवायचं असेल तर बरीच तडजाेड करावी लागते. एक गाेष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की मांसातून जितक्या सहजपणे लाेह शरीराला मिळतं तितक्या सहजपणे वनस्पतीतून मिळत नाही. पुरेसं लाेह शरीराला मिळावं यासाठी माेड आलेली धान्ये, शेंग भाज्या, तीळ, सूर्यबिया, लाल भाेपळा बिया, मश्रूम्स, डाळी, सुकामेवा आहारात यांचा जास्त प्रमाणात समावेश असणं आवश्यक आहे. आयनशरीराला सहज पचावं यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. यासाठी सलाड आहारात असावं.
व्हिटॅमिन बी -12: रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यासाठी आणि मेंदूच्या अॅक्टिव्हिटीसाठी व्हिटॅमिन बी-12 ार महत्त्वाची भूमिका पार पाडतं. व्हिटॅमिन बी ची कमतरता म्हणजे शरीरात वेदना, अशक्तपणा, थकवा, चक्करणारा मेंदू. जर हे व्हिटॅमिन शरीराला दीर्घकाळ मिळालं नाही तर मेंदूच्या क्षमतेवर परिणाम हाेताे आणि अल्झायमर हार्ट डीसिजसारखे आजार मागे लागतात.
काय कराल: तसं बघायला गेलं तर शाकाहारी अन्नपदार्थात व्हिटॅमिन बी चं अस्तितत्व नसतंच. साेया प्राॅडक्ट, ब्रेकास्ट सेरल्स आणि चीज ब्रेड यात पुरेशा प्रमाणात बी-12 असतं. शिवाय यिस्ट हा व्हिटॅमिन बी-12 चा उत्तम स्त्राेत आहे.
व्हिटॅमिन ए: डाेळ्यांच्या आराेग्यासाठी व्हिटॅमिन ए ार आवश्यक असतं. शिवाय थायराॅईड ंक्शनमध्ये हे व्हिटॅमिन महत्त्वाची भूमिका पार पाडतं. त्वचा आराेग्य, पेशींची वाढ यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास प्रतिकार शक्तीत कमी हाेणं, काेरडे केस, काेरडी त्वचा, अनिद्रा, थकवा, मुरुम आणि वजन झपाट्याने कमी हाेणं ही लक्षणं दिसतात.
काय कराल:भरपूर व्हिटॅमिनसाठी आहारात संत्री, गाजर, सुरण, स्क्वॅश, अॅप्रिकाॅट (जर्दाळू), पालक, केल(काेबीची एक जात), बीट याचा आहारात माेठ्या प्रमाणात समावेश असायला हवा.क्रिएटिन ः हे एक प्रकारचं ऑरगॅनिक अॅसिड आहे.व्यायाम करताना यामुळे स्नायू पेशींना एनर्जी मिळते.स्नायू शक्ती, शारीरिक बल आणि जाेमदार स्नायूंसाठी हे अॅसिड महत्त्वाची भूमिका पार पाडतं.
काय कराल: मांस आणि मासे यात क्रिएटिन माेठ्या प्रमाणावर असलं तरी शाकाहारी आहारात हे अॅसिड पुरेशा प्रमाणात सापडत नाही. मात्र शेंगदाणे, अक्राेड, नारळ, साेयाबिन, चणे, ओट्स, समुद्री शैवाल, सूर्यबिया यात हे आवश्यक अॅसिड माेठ्या प्रमाणात सापडतं.
कार्नाेसाईन:हे एक अमिनाे अॅसिड असून अनेक चिवट आणि गंभीर आजार दूर ठेवायला हे अमिनाे अॅसिड उपयुक्त आहे. मासाहारी अन्नपदार्थाच्या तुलनेत हे अमिनाे अॅसिड शाकाहारी पदार्थात कमी आढळून येतं त्यामुळे हे अॅसिड तयार करणारे घटक पदार्थ म्हणजे हिस्टिदाईन असलेले सफरचंद केळी, भात, गहू, राय, पालक, साेया, दूध या पदार्थांचा आहारात माेठ्या प्रमाणात समावेश हवा.