अमेरिकेतील फ्लाेरिडा राज्यात असलेल्या जगप्रसिद्ध वाॅल्ट डिस्ने वर्ल्ड रिसाॅर्टमध्ये प्रथमच दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे लावणी नृत्य, राजस्थानसह अनेक राज्यांतील नृत्यांच्या माध्यमातून जगाला भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्यात येणार आहे. 400 अमेरिकन कलाकार डिस्ने स्प्रिंग आणि डिस्ने किंग्डम थीम पार्क येथे भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम आयाेजित करणार आहेत. यापूर्वी 26 ऑ्नटाेबर राेजी थीम पार्कमध्ये भारतीय नृत्य संध्या आयाेजित करण्यात आली हाेती. त्यात भारतीय गाण्यांसाेबतच पाॅप आणि हिप पाॅप गाण्यांवर दर्शकांनी ठेका धरला हाेता.या वेळी 100 पेक्षा जास्त मूळ भारतीय कलाकार त्यांची पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले हाेते.