बायकाे म्हणजे बायकाे असते

    05-Nov-2023
Total Views |
 

wife 
 
महेंद्रसिंह धाेनी हा भारतीय संघाचा कॅप्टन कूल. हा माणूस विशेष आहे.ताे केवळ क्रिकेटपटू नाही, फार लहान वयात उत्तम परिपक्वता लाभलेला, आयुष्याची दिशा समजलेला माणूस आहे. सचिन तेंडुलकरप्रमाणेच धाेनीही मध्यमवर्गीय घरातूनच पुढे आलेला आहे. त्याच्यावरचे संस्कार वेगळे आहेत, हे त्याच्या प्रत्येक मुलाखतीत दिसतं. माही आणि त्याची पत्नी साक्षी ही जाेडी फार क्यूट आहे. या दाेघांचे त्यांच्या लेकीबराेबरचे फाेटाे, व्हिडिओ ट्रेंडिंग असतात नेहमी. एका मुलाखतीत माहीला लग्न या विषयावर बाेलतं केलं गेलं तेव्हा ताे विनाेदाने म्हणाला, बायकाे सगळ्यांची सारखीच असते.अमक्याची आपल्या बायकाेपेक्षा वेगळी असेल, असं वाटत असेल एखाद्याला तर ते साफ चुकीचं आहे.
 
तुम्ही भारतीय संघाचे कप्तान असा, माजी कप्तान असा किंवा काेणीही असा, घरात तुमचं स्थान ठरलेलं असतं आणि ते तुम्ही नाही, बायकाेने ठरवलेलं असतं.तुम्ही जे निर्णय घेता, ते प्रत्यक्षात तिने घेतलेले असतात, तुमच्याकडून ती वदवून घेते फक्त. शिवाय ते फसले तर वर, तुझा निर्णय हाेता, मी तेव्हाच सांगत हाेते, असा टाेला असताेच. माही म्हणताे, हे आपण सगळेच गंमतीत बाेलताे, मी बायकाेलाही पाहताे, माझ्या आईलाही पाहिलं आहे; अनुभवाने सांगताे, बायकाे तुमच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते.