जगातील सर्वांत लहान कॅरेव्हॅन

    05-Nov-2023
Total Views |
 
 


van
 
केंब्रिजचे ड्यूक आणि डचेसच्या विवाहानिमित्त फक्त दीड मीटरची कॅरेव्हॅन 2011 मध्ये तयार करण्यात आली हाेती. नवविवाहित शाही जाेडपे पाहण्यासाठी लाेक कित्येक तास रस्त्याच्या कडेला उभे हाेते. शाही जाेडप्याची मिरवणूक केव्हा येते याची ते वाट पाहात हाेते. त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून हे जगातील सर्वांत छाेटे माेटर हाेम तयार करण्यात आले हाेते.इटीए नावाच्या विमा कंपनीने राजेशाही समारंभात लाेकांना सुविधा मिळाव्यात यासाठी वाहन तयार करण्याची जबाबदारी यानिक रीड नावाच्या कार सजावट कलाकारावर साेपवली हाेती. त्याने या कॅरेव्हॅनला ्नयुटीव्हॅन हे नाव दिले. 2014 मध्ये या वाहनाची जगातील सर्वांत छाेटे वाहन म्हणून गिनीज बुकमध्ये नाेंद झाली.हे वाहन माेटरसायकलने ओढतात.कारण या वाहनाला इंजीन नाही. या कॅरेव्हॅनमध्ये बार, किचन, डायनिंग स्पेससुद्धा आहे. या शिवाय साेलर पॅनल आणि सॅटेलाइट डिशसुद्धा आहे.हे वाहन फक्त भव्यदिव्य साेहळ्याप्रसंगी येणाऱ्या लाेकांसाठी तयार केले हाेते.