लालभडक नव्हे, जांभळ्या ज्वालांचा ज्वालामुखी

    05-Nov-2023
Total Views |
 
 
 

Volcano
 
 
 
युराेपियन स्पेस एजन्सीने हॅलाेविन स्पेशल एपिसाेडअंतर्गत जगातील सर्वांत भयानक ठिकाण म्हणून एका ज्वालामुखीचा व्हिडिओ शेअर केला आहे. साधारणपणे ज्वालामुखीचा उद्रेक झाला की लालभडक रंगाच्या ज्वाला निघतात, परंतु इंडाेनेशियामधील जावा बेटावरचा ज्वालामुखी लालभडक नव्हे, तर जांभळ्या रंगाच्या ज्वाला फेकताे. या ज्वालामुखीचे कावाह इजेन असे नाव आहे.त्याचा आकार तलावाप्रमाणे आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हा खड्डा तयार झाला हाेता. त्यातून आजही निळ्या, जांभळ्या रंगाच्या ज्वाला निघतात. हे दृश्य फक्त रात्री दिसते. या भागात सल्फर माेठ्या प्रमाणावर मिळते. इंडाेनेशियात सल्फरचा वापर साखर स्वच्छ करण्यासाठी किंवा औषधे तयार करण्यासाठी केला जाताे.