कधीतरी सुटीच्या दिवशी काही काम न करणे वेगळे आणि सदा सर्वकाळ निष्क्रिय राहणे वेगळे असते. यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. ध्येय जर असेल, तर त्यामुळे दिवसाचे चाेवीस तास कसे वापरायचे आहेत, याबद्दल माणूस विचार करताे. स्वत:ची बुद्धी वापरताे, नवनवीन गाेष्टी शिकताे, वेगवेगळी काैशल्ये आत्मसात करताे. ह्यामुळे जगण्याचा एक उत्साह आणि जिज्ञासादेखील टिकून राहते.एखादा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असताे, तेव्हा त्याला आपल्याला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचे आहे, ही गाेष्ट नेहमी ध्यानात ठेवावी लागते. परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे व्हायचे याचा विचारच विद्यार्थ्याने केला नाही आणि ताे नुसताच करायचा म्हणून अभ्यास करत राहिला, तर ताे त्याच्या ध्येयापासून रस्ता चुकताे आणि परीक्षेत अनुत्तीर्ण हाेताे.यासाठी जीवनात पुढे जायचे असेल कवा आपला उत्कर्ष साधायचा असेल, त्यासाठी एखादे ध्येय ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ध्येयच नसेल, तर मनुष्याच्या प्रयत्नांना काहीही अर्थ उरत नाही.
काेणतेही लक्ष्य समाेर नसताना, एखादे ध्येय नसताना, जर काेणी जावन जगत असेल, तर अशा अवस्थेत काेणताही प्रयत्न हा सफल हाेऊ शकत नाही.जर तुमची काम करायची इच्छाच नसेल, संसारात इतरांची सेवा करायची नसेल, तर जीवनात तुम्ही काहीही करू शकणार नाही, या ध्येयासाेबत नेहमी एक गाेष्ट ध्यानात घ्यायला हवी की, संसारात काेणावरही ओझं बनून राहू नका. तीव्र क्रियाशीलतेने मनुष्य जीवनाचे सार्थक हाेते. आज आळशी व्हावे अशीच आजूबाजूला परिस्थिती आहे. टेक्नाॅलाॅजीमुळे विनासायास गाेष्टी आपल्याला हातात मिळतात; पण मग त्याचे वाईट परिणामदेखील आपण भाेगत आहाेत. बैठ्या कामांमुळे शहरातून लठ्ठपणाची समस्या तयार झाली आहे. मी निराेगी राहीन आणि माझे अतिरिक्त वजन अजिबात वाढू देणार नाही, हे तर ध्येय प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. समाेर जर काही ध्येय असेल, तर आपल्या जगण्याला एक शिस्त लागते.