आपला मेंदू सक्रिय ठेवा; संकटावर मात करा

    05-Nov-2023
Total Views |
 
 

Brain
 
 
 
जीवन आहे तर तणाव राहणारच. ताे जगण्याचा एक अविभाज्य भाग असला, तरी तणाव किती घ्यावा याची मर्यादा ठेवणे आराेग्यासाठी आवश्यक असते. सततच्या आणि आत्यंतिक तणावामुळे मेंदूचे कार्य बिघडायला लागून नवीन विकार सुरू हाेतात. तणावातून साध्य काहीच हाेत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. एका महिलेचा अनुभव पाहा. काही वर्षांपूर्वी तिच्या दाेन्ही हातांना गंभीर जखमा झाल्याने ती अंशत: अपंग झाली आणि त्यातून तिला नैराश्य आले. दिवसभरात एक-दाेन तास काम करणे आणि बाकी दिवसभर नुसते बसून राहणे भाग हाेते. यातून ती कधी बरी हाेणार हे काेणी सांगू शकत नव्हते. यातून ही महिला उदास हाेऊ लागली. आपण पुन्हा काॅम्प्युटर वापरू शकणार का, गाडी चालवू शकणार का, असे प्रश्न तिला पडायला लागले. हात जायबंदी हाेण्यापूर्वी ही महिला तिचे करिअर बदलण्याच्या विचारात हाेती आणि आता ती निराश झाली हाेती.
 
तुमच्याबाबत असे काही घडले असेल, तर तुम्हाला या महिलेची मन:स्थिती समजेल. आपले विचार आपल्याला अंधाऱ्या गुहेत कसे ढकलतात हे तुम्हाला कळेल.एखाद्या समस्येबाबत तुम्ही टाेकाचा वाईट विचार करता तेव्हा त्याचा प्रभाव आपला मेंदू आणि शरीरावर जाणवायला लागताे. पण, आपला मेंदू आणि तंत्रिका तंत्र अशा स्थितीपासून बचावासाठी तयार असतात. टाेकाचे वाईट विचार करणे हासुद्धा स्वत:ला आगामी संकटाला सामाेरे जाण्यास सज्ज करण्याचा मार्ग असताे. आपल्या मेंदूला एखाद्या संकटाची जाणीव झाली, की ताे वेळ न गमाविता शरीरात तणाव वाढविणाऱ्या ‘काेर्टिसाेल’ नावाच्या संप्रेरकाचा स्राव वाढविताे. प्रत्येकाच्या मेंदूमध्ये एक नकारात्मकभाग असताे आणि त्यामुळेच काही समस्या आपल्याला जास्त त्रासदायक वाटतात. ही महिला शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतानाच्या स्थितीत तिच्या तंत्रिका तंत्राने शरीराला टाेकाच्या तणावाच्या स्थितीत नेले. या स्थितीत काही चांगले घडण्याची अपेक्षा नसते.
 
कालांतराने ही महिला तणावाच्या स्थितीतून काहीशी बाहेर आली. तिला काही उपाय सुचू लागले. हे उपाय याेजून तिने संकटावर मात केली.आत्यंतिक तणावामुळे चेतनेवर परिणाम हाेऊन आपल्या मेंदूतील समस्यांवर मार्ग काढणारा भाग व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे चिंता, निराशा आणि तणाव वाढविणारी जैविक रसायने शरीरात तयार हाेऊ लागतात. तणाव आणि गंभीर संकटाच्या काळात मेंदू कसा काम करताे हे समजून घ्या. समाेरच्या परिस्थितीनुसार सुरक्षित राहण्यास सर्वाेत्तम उपाय ही शरीराची पहिली प्रतिक्रिया असते. प्राचीन काळात रानटी प्राण्यांपासून बचावासाठी ती उपययुक्त हाेती. मात्र, आपला मेंदू सध्याच्या स्थितीला अनुकूल झालेला नसणे ही समस्या आहे. पण, वाईट स्थितीपासून बचावासाठी आपले शरीर अशी प्रतिक्रिया देत असल्याचे समजल्यावर तुम्ही तुमच्याबाबत वाईट विचार करणे बंद कराल. तुम्ही तुमच्या विचारांवर किती नियंत्रण मिळवू शकता, हा तणाव दूर करण्याचा एक मार्ग आहे. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवलेत, तर तुम्ही आशादायी विचार करून नैराश्यातून बाहेर येऊ शकता.
 
विचार बदला : आपले विचार बदलून तंत्रिका तंत्र संतुलित ठेवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण, आपल्याला हे करावयाचे असल्याचा निश्चय तुम्हालाच करावा लागेल. भविष्यातील संभाव्य समस्यांचा विचार करून त्यांना सामाेरे जाण्यासाठी तयारी करणे, त्यासाठी आपल्या विचारांत बदल करणे आवश्यक आहे आणि ते तुम्हालाच करावे लागेल.
 
लक्ष केंद्रित करण्याचा अभ्यास : अनेकदा इच्छा असूनही आपण कशावरच लक्ष केंद्रित करू शकत नाही.डाे्नयातून एखादा विचार जात नसेल, तर खाेलीतील एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नजर न हटविता फक्त त्या वस्तूकडे पाहून त्याच्या आसपासच्या घडामाेडींकडे सजगतेने लक्ष द्या. कमीतकमी वीस सेकंद हे करा आणि त्याची पुनरावृत्ती करा.
 
श्नयता मर्यादित करू नका : समस्या साेडविण्याचे अनेक मार्ग असल्याने त्यातील काेणता आपल्याला उपयाेगी पडेल याचा विचार करा.काेणती संधी आपण घेऊ शकताे हे पाहा आणि त्यांची नाेंद करून ठेवा. पुन्हा कधी असा प्रसंग आल्यास, त्याचा उपयाेग हाेताे.
 
स्वत:ला अनुभवा : दाेन्ही तळहात एकमेकांवर रगडून गरम करा आणि लक्ष अनुभवावर केंद्रित करा. तीस सेकंद असे करा. आपले हात खांद्यांजवळ आणून स्वत:ला आलिंगन द्या. यातून तुम्ही स्वत:ला अनुभवू शकता.
 
चांगल्याचा विचार करा : वाईट स्थिती असताना चिंता करणे याेग्य असले, तरी अतिचिंता त्रासदायक ठरते. काेणतीही वेळ कायम राहत नाही.संकटांचेही तेच असते. ती कायम राहणारी नसतात. त्यामुळे कायम चांगले हाेण्याचा विचार करा.