एकदा तरी रायगडावर जाऊन कपाळी माती लावावी...

29 Nov 2023 00:41:35
 

raigad 
 
रायरी हे या डाेंगराचे जुने नाव.ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील ताेरणा, दक्षिणेकडील कांगाेरा चांभारगड-साेनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घाेसाळगड या किल्ल्यांची रायगडाभाेवती संरक्षणाची फळी उभी राहिली. हे जाणूनच शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली.नगारखाना, मनाेरे, बुरूज, मंदिरे इ. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत.त्यांच्या अवशेषांमधून या वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते.रायगडावर पाचाडकडून वाडीमार्गे जाणारा रस्ता अधिक साेयीचा आहे.किल्ल्यास हिरकणी, टकमक, भवानी आणि श्रीगाेंदे अशी चार टाेके आहेत.चाेर दरवाज्याशिवाय किल्ल्याला एकच महाद्वार आहे. इतर बाजूंनी कातळ व काही ठिकाणी तटबंदी आहे. नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून त्याच्या आतील बाजूस महादरवाजा लागताे.
 
तेथे बावीस मीटर उंचीचे दाेन बुरूज आहेत. पहारेकऱ्यांसाठी दाेन देवड्या हाेत्या. त्यातून आत गेल्यानंतर काेठारे लागतात. दक्षिणेस आडवाटेला चाेरदरवाजा आहे.छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनविली.शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे.महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, देशाच्या इतिहासातील एक गाैरवास्पद आणि अभिमान वाटावी अशी घटना आहे.अशा या ऐतिहासिक आणि गाैरवशाली इतिहासाचा वारसा असलेल्या गडावरील काही ठिकाणांविषयी....महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील बाजूला वर दाेन्हीकडे दाेन सुंदर कमळाकृती काेरल्या आहेत.महादरवाज्याला दाेन भव्य बुरूज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचआहे.
तटबंदीमध्ये जी उतरती भाेके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भाेके ठेवलेली असतात.
Powered By Sangraha 9.0