5 नाेव्हेंबरला लडाखमधील डेनले व मेरक परिसरात अकाशातअचानक लाली निर्माण झाली हाेती. या लालीचे दृश्य दुर्मीळ असल्याचे इंडियन अॅस्ट्राेनाॅमिकल ऑब्झर्वेेटर यांचे म्हणणे आहे.या लालीला स्टेबल ओराेरल रेड असे म्हणतात. हे लाल रंगाचा धु्रवीय प्रकाश कित्येक वर्षांनंतर दिसला आहे. धु्रवीय प्रकाश पडल्यानंतर आकाशात लाली पसरते. साैर वादळामुळे पृथ्वीच्या मॅग्नेटाे स्टिमेयरमध्ये माेठ्या प्रमाणावर डिस्टर्बन्स निर्माण झाला आहे, त्यामुळे जिओमॅग्नेटिक वादळ आल्यामुळे आकाशात लाली पसरल्याचे दृश्य पाहण्याची लडाखवासियांना संधी मिळाली.