
वाशी परिसरात काळ्या जादूच्या नावाखाली 56 वर्षीय महिलेकडून 78 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पाेलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, सात आराेपींनी या वर्षी जानेवारी ते नाेव्हेंबर दरम्यान धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेकडून 42.08 लाख रुपये किमतीचे 105 ताेळे साेने आणि 36.65 लाख रुपये राेख घेतले. त्यानंतर पीडितेला अर्धांगवायू झाला. आराेपी पीडितेला पती, मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देत हाेते. या सात जणांवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाइस आणि इतर अमानुष, वाईट आणि अघाेरी प्रथा आणि काळी जादू कायदा 2013 च्या तरतुदींनुसार आराेप करण्यात आले. मात्र, आराेपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.काळ्या जादूच्या नावाखाली महिलेकडून 78 लाख उकळले हे प्राणी भावनिक आधार देतात, त्यांच्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते आणि ते तणावही कमी करतातहाैस म्हणून किंवा एकाकीपणात काेणाचा तरी सहवास म्हणून अनेक जण प्राणी-पक्षी पाळायला लागले आहेत. पाेपटासारखे पक्षी आणि कुत्रा-मांजर यांना त्यात जास्त पसंती दिसते.
या प्राण्यांना खाऊ-पिऊ घालणे, त्यांच्याबराेबर खेळणे, त्यांना फिरवून आणणे आदी कामांमुळे तणावांचा निचरा हाेताे. लहान मुलांच्या विकासासाठीसुद्धा पाळीव प्राणी उपयुक्त असल्याचे आता समाेर आले आहे. शिवाय, कुत्र्यासारखा इमानदार प्राणी मुलांचे रक्षण करण्याचे कामही करताे. मानव आणि प्राणी यांचा संबंध इतिहासातून दिसताे. मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आराेग्यासाठी घरातील पाळीव प्राणी उपयाेगी पडत असल्याचे शास्त्रीय कसाेट्यांवर सिद्ध झाले आहे. पाळीव प्राण्यांचे फायदे काय, ते पाहा.सहवास आणि भावनिक आधार : सहवास हा प्राणी पाळण्याचा माेठा फायदा असून, ते असल्यामुळे आपल्या साेबत काेणीतरी असल्याची आश्वासक भावना निर्माण हाेते. घरातील लहान मुलांना तर त्याचा जास्त फायदा हाेताे. हे प्राणी निरपेक्षपणाने प्रेम करतात आणि तुम्हाला सहवास देतात. एकाकी असलेल्या अथवा चिंता वाटणाऱ्यांना घरात प्राणी असणे उपयुक्त ठरते. घरातील पाळीव प्राण्यांमुळे मुलांना भावनिक आधार मिळून सुरक्षित वाटत