वाचनामुळे जीवन म्हणजे काय याची जाणीव समृद्ध हाेते

26 Nov 2023 00:46:46
 
 

reading 
 
विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांम धील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्म क परिणाम हाेताे आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकाेन कायमचा बदलून जाताे. पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशाआकांक्षाचे क्षितीज निर्माण करणारे साधन आहे.पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जाताे. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळताे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त हाेताे.
 
आजकालच्या तरुणांना खूप ताण असताे. त्या अनुषंगाने वाचन त्यांना मदत करू शकते. वाचनामुळे माणूस प्रगल्भ हाेताे. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण हाेईल. वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल हाेते, कल्पनाश्नतीला वाव मळताे, रसिकता वाढीस लागते, सर्जनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त हाेते.मन संकुचित, क्षुद्र गाेष्टीत अडकत नाही.वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे माेल किती अनमाेल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही.
Powered By Sangraha 9.0