यूएईचे सर्वांत श्रीमंत अमिरात दुबईमध्ये एक नवे आयलँड तयार करण्यात आले आहे. गेल्या गुरुवारी त्याचे उद्घाटन झाले. येथील एका रिसाॅर्टमध्ये 800 खाेल्या फक्त पर्यटकांसाठी आहेत. हे आयलँड रियू दुबई रिसाॅर्टजवळ आहे. लवकरच या आयलँडमध्ये हाॅटेल आणि बीच साईड प्राॅपर्टी साकारणार आहे. दुबईचे प्रसिद्ध पाम आयलँड तयार करणारी कंपनी नखिल नवे आयलँड विकसित करीत आहे.