सणांच्या हंगामात स्मार्ट हाेम अ‍ॅप्लायन्सेसना वाढती मागणी

    24-Nov-2023
Total Views |
 
 

Appliances 
बदलत्या काळात महिलाही नाेकरी करावयास लागल्यामुळे त्यांची घर आणि नाेकरी अशी दुहेरी कसरत हाेते. महिलांचा जास्त वेळ जाताे ताे स्वयंपाकघरात.कापणे, दळणे, शिजविणे आदी क्रियांत वेळ फार जात असल्याने आणि त्याचीच कमतरता असल्याने ताे वाचविणारी म्निसरसारखी अनेक उपकरणे सेवेत आली आहेत. दिवाळी नुकतीच संपली. काेणत्याही सणाच्या काळात काही नवीन खरेदी ठरलेली असते.
 
स्मार्ट हाेम अ‍ॅप्लायन्सेसच्या खरेदीकडे वाढलेला कल हे यंदाच्या हंगामातील खरेदीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘ग्राहकांची बदललेली मानसिकता हाेम अप्लायन्सेसच्या वाढत्या मागणीतून कळते.बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता आणि चांगल्या उत्पन्नामुळे त्यांना मागणी आहे.यंदाच्या हंगामात स्मार्ट रेफ्रिजरेटर आणि एअर फ्रायर्सना चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. ही उपकरणे वेळ वाचवितात,’ असे हाेम अ‍ॅप्लायन्सेची विक्री करणाऱ्या एका स्टाेअरचे व्यवस्थापक पंकज गाराेडिया यांनी सांगितले. सध्या बाजारात मागणी असलेल्या तीन स्मार्ट उत्पादनांविषयी आपण जाणून घेऊ.
 
राेबाेटिक व्हॅ्नयुम ्नलीनर : काेराेना महामारीच्या काळात घरेलू कामगार येणे बंद झाल्यामुळे घराच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित उपकरणे किती महत्त्वाची आहेत याची जाणीव झाली. अनेक घरांत राेज फरशा पुसणे आणि केर काढणे हा एक माेठा कार्यक्रम ठरताे.त्यामुळे लाॅकडाउनचे निर्बंध संपताच, डिशवाॅशर आणि राेबाेटिक व्हॅ्नयुम ्नलीनरची मागणी वाढली.