देशात रस्ते अपघातात घट; प्राणहानीत मात्र वाढ

    24-Nov-2023
Total Views |



Acciden
 
 
वाहन घेणे साेपे असले, तरी ते चालविणे हे जबाबदारीचे काम असल्याचा विसर पडल्यावर अपघात हाेणे अपरिहार्य असते.वाहतुकीचे नियम आपल्याच सुरक्षेसाठी असले, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, सिग्नल ताेडणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे, चालकाची बेफिकिरी आणि वाहनाची स्थिती चांगली नसणे अशी काही कारणे त्यामागे आहेत.रस्ते अपघातांचा विचार केला, तर भारतात त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. सन 2022चा विचार केला, तर या वर्षात दशकातील सर्वांत कमी अपघात हाेऊनही मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे. सन 2022मध्ये देशात 4 लाख 61 हजार 312 अपघातांची नाेंद झाली हाेती आणि दहा वर्षांपूर्वी; म्हणजे 2012मध्ये ही संख्या हाेती 4 लाख 90 हजार 383. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘राेड अ‍ॅ्निसडेंट्स इन इंडिया 2022’ या अहवालातील ही माहिती आहे.

सन 2021च्या तुलनेत यात 11.9 ट्न्नयांची वाढ झाली हाेती. गेल्या वर्षी 1 लाख 68 हजार 491 लाेकांनी अपघातात प्राण गमाविले हाेते आणि 2012च्या तुलनेत हे प्रमाण 21.9 ट्न्नयांनी जास्त आहे. सन 2012मध्ये 1 लाख 38 हजार 258 लाेकांचे प्राण गेले हाेते.या अपघातात राष्ट्रीय हमरस्त्यांचा वाटा 32.9 टक्के आणि राज्य महामार्गांचा वाटा 23.1 टक्के हाेता. अतिवेगामुळे (ओव्हरस्पिडिंग) 72 टक्के अपघात झाले हाेते. चुकीच्या बाजूने (राँग साइड) वाहन चालविल्यामुळे अथवा लेनची शिस्त न पाळल्यामुळे 4.9 टक्के आणि दारू अथवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालविल्यामुळे 2.2 टक्के अपघात झाले हाेते. वाहतुकीचे नियम आपल्याच सुरक्षेसाठी असले, तरी ते न पाळण्याच्या वृत्तीमुळे अपघात वाढतात. चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे आणि दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट न वापरणे सर्वाधिक प्राणघातक ठरत असून, हे सुरक्षा नियम न पाळल्याने 40 टक्के लाेकांना प्राण गमवावे लागल्याचे आकडेवारीतून दिसते.

अपघातग्रस्तांत 44.5 ट्न्नयांसह दुचाकीचालक पुढे असून, त्यानंतर पादचाऱ्यांचा (19.5 टक्के) क्रमांक आहे.ग्रामीण भागात सर्वाधिक अपघात झाले असून, त्यांचे प्रमाण 61.6 टक्के आहे. ‘क्रिसिल रिसर्च’च्या माहितीनुसार, ग्रामीण भागांतील रस्त्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिकवर्ष 2022मध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खर्च 0.27 ट्रिलियन रुपये हाेता. हेच प्रमाण राष्ट्रीय हमरस्त्यांबाबत 1.2 ट्रिलियन आणि राज्य महामार्गांबाबत 1.5 ट्रिलियन रुपये हाेते.आर्थिक वर्ष 2016पासून ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खर्च फक्त 49 ट्न्नयांनी वाढला आहे. राज्य महामार्गांबाबत ताे 72 टक्के आणि राष्ट्रीय हमरस्त्यांबाबत ताे 401 ट्न्नयांनी वाढला आहे. देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत अपघात जास्त हाेतात. देशातील एकूण रस्ते अपघातांत पाच राज्यांचा वाटा निम्मा आहे.

त्यात तमिळनाडू (64,105), मध्य प्रदेश (54,432), केरळ (43,910), उत्तर प्रदेश (41,746) आणि कर्नाटक (39,762) यांचा समावेश हाेताे. दहा लाखांपेक्षा जास्त लाेकसंख्या असलेल्या पन्नास शहरांत 5,652 अपघातासह दिल्ली अव्वल आहे. या शहरात अपघातात जखमी हाेणाऱ्यांचे प्रमाणही फार माेठे आहे. सरळ रस्ते हेही अपघाताचे एक कारण असून, त्यामुळे 67 टक्के अपघात झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात 2021मध्ये जगातील सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याची नाेंद चीनमधील ‘इंटरनॅशनल राेड फेडरेशन’च्या अहवालात आहे. भारतानंतर 62,218 मृत्यूंसह चीन दुसऱ्या, 42,915 मृत्यूंसह अमेरिका तिसऱ्या आणि 25 हजार 266 मृत्यूंसह इंडाेनेशिया चाैथ्या क्रमांकावर हाेते. त्या वर्षी भारतात रस्ते अपघातात एक लाखापेक्षा जास्त लाेक मरण पावले हाेते. रस्ते दुर्घटना कमी करण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या जात असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत नुकतीच दिली आहे.