का लावता मुलांना चाॅकलेटचे व्यसन?

    21-Nov-2023
Total Views |


chocklate
साै. गाेडबाेले सांगतात की , त्यांची मुलगी राणी खूप चाॅकलेट खाते. तिच्या या सवयीने त्या त्रासून गेल्या आहेत. ही समस्या फक्त साै.गाेडबाेल्यांचीच नसून चाॅकलेट खाण्याची सवय जडलेल्या सर्व मुलांच्या पालकांची आहे. या समस्येचे मूळ कारण मुलांचे आई-वडीलच असतात. अती लाडप्रेमापाेटी मूल आईच्या अंगावर दूध प्याल्यानंतरही रडत राहते. अशा वेळी त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात चाॅकलेट दिले जाते. मूल ते चाेखत राहाते.एवढेच नव्हे तर मुलांना शाळेत जाताना त्यांच्या टिफिन बाॅ्नसमध्येही आजकालचे पालक चाॅकलेट देत असतात.

तर काही पालक मुलांना चाॅकलेट खरेदी करण्यासाठी पैसे देत असतात. यामुळेच मधल्या सुटीत बऱ्याच शाळांबाहेर मुले चाॅकलेट खरेदी करताना दिसत असतात.चाॅकलेटने मुलांचे दात तर खराब हाेतातच, शिवाय त्यांचे पाेटही बिघडते.त्यांची पचनप्रणालीगडबडून जाते. ती वरचेवर पाेटदुखीच्या समस्येने त्रस्त राहतात. जर आपल्या मुलांच्या बाबतीत या समस्या उद्भवू नयेत असे वाटत असेल तर काही गाेष्टी अमलात आणायला हव्यात.

= जर मूल लहान असेल तर ते रडल्यानंतर त्याला गप्प करण्यासाठी त्याच्या हातात पाेळीचा तुकडा वा उत्तम प्रतीचे बिस्कीट वा फळ द्यावे.
=शाळेत जाणाऱ्या मुलांना ताजा नाश्ता द्यावा. टिफिन बाॅ्नसमध्ये पाेळी-भाजीच द्यावी. हवा तर साेबत पापड भाजून वा तळून द्यावा.
= घरातही मुलांना खिचडी, उप्पीट, फळांचा रस, ताज्या भाज्यांचे सूप,इ. पाचक व पाैष्टिक पदार्थच द्यावेत.