पाणी प्या, ना कमी-ना जास्त

    21-Nov-2023
Total Views |
 
 

Water 
उन्हाळ्यात घाम येत असल्यामुळे वारंवार तहान लागते व त्यामुळे पाणी जास्त प्याले जाते, पण हिवाळ्यात असे हाेत नसते. थंडीत पाणी कमी प्याले जाते. आपल्या शरीराचा सुमारे 75 टक्के भाग पाण्यापासून बनलेला आहे. शरीराचे सारे अवयव व्यवस्थित काम करीत राहावेत यासाठी शरीरात पाण्याची पातळी टिकून राहणे आवश्यक असते.
 
थंडीतही प्या पुरेसे पाणी : श्वास घेताना, अन्न पचवताना, घाम व लघवीवाटे शरीरातून पाणी सतत बाहेर पडत असते. जर शरीरात पाण्याची पातळी 10 ट्न्नयांच्या खाली गेली तर थंडीतही पाण्याची कमतरता हाेते. यामुळे त्वचा रूक्ष हाेणे, ओठ फुटणे, डाेकेदुखी, चिडचिड, काेरडा खाेकला, नाक वाहणे, गरजेपेक्षा जास्त भूक लागणे आणि ब्लडप्रेशर हाय हाेणे अशा समस्या हाेऊ शकतात. पाणी कमी झाल्यास संक्रमणाची श्नयता वाढवणारे विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडू शकत नाहीत. पाण्याच्या अभावाची तपासणी लघवीच्या रंगावरून स्वत:लाही करता येऊ शकते. दाट पिवळ्या रंगाची लघवी पाण्याच्या कमतरतेची निशाणी आहे.लघवीचा रंग नेहमी फिकट पिवळा असायला हवा.
 
किती पाणी प्यावे : पाणी जास्त पिणे र्नतातील साेडियमची पातळी कमी करीत असते. याला हायपाेनेट्रेनिया म्हणतात. असे झाल्यास उलटी येणे व शरीराला सूज यासारखी लक्षणे दिसतात. स्थिती गंभीर असल्यास थकवा, चक्कर, भ्रम, चिडचिडेपणा व अश्नतपणाही येऊ लागताे. शरीरातील आवश्यक खनिजे लघवीवाटे बाहेर पडू लागतात.सामान्यत: एका दिवसात सुमारे 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जाताे. पण हे व्य्नतीच्या दिनचर्येवर व वयावर अवलंबून असते. आठ वर्षापर्यंतच्या मुलांना एक ते दाेन लिटर तर किशाेरवयीन मुलांना अडीच ते साडेतीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जाताे. माेठ्यांनी 3 ते 4 लिटर तर जास्त श्रम करणाऱ्यांनी 5 लिटर पाणी प्यायला हवे. स्तनपान करवणाऱ्या महिलांनाही पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जाताे.
 
थंड पाण्याने हाेऊ शकताे त्रास : आयुर्वेदानुसार थंड पाणी वात, पित्त, व कफ दाेषांमध्ये असंतुलन निर्माण करते. यासाठी खाताना व नंतर थाेडे थाेडे काेमट पाणी प्यावे. आपले शरीर थंड पाणी शाेषण्यासाठी बनलेले नाही. काही लाेकांना जास्त श्रम केल्यानंतर थंड पाणी प्याल्यामुळे पाेटात तीव्र वेदना हाेऊ लागतात. हिवाळ्यात थंड पाणी प्याल्यामुळे पचनप्रणालीवर दुष्परिणाम हाेताे. ज्यामुळे स्थूलता वाढते तसेच अन्न पचवण्यातही अडचणी येतात.थंडीत जडान्न खाल्ल्यानंतर थंड पाणी प्याल्यामुळे र्नतवाहिन्या कडक हाेतात व अन्नातील चरबी आतड्यांच्या आतील भिंतींवर साठू लागते.निरनिराळ्या संशाेधनात हेही आढळून आले आहे की, थंड पाणी प्याल्यामुळे हृदयाचा वेग मंदावताे. थंड पाणी नर्व्हस सिस्टीममधील बेगस नावाच्या शिरेला उत्तेजित करते. ज्यामुळे हृदयाचा वेग मंद पडू लागताे.