आता राेबाेट पायलट कार चालविणार

    21-Nov-2023
Total Views |
 
 


Robot
 
 
कार खरेदी करणे साेपे आहे. पण, कारची निगा राखणे कठीण आहे. त्यातच जर आपल्याला वाहन चालवता येत नसेल, तर चालक ठेवावाच लागेल.पण, त्याला टिकवून ठेवणे खूपच कठीण असते. त्यामुळे आता ‘अमेरिकन डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च प्राेजे्नट’ अंतर्गत राेबाेट संचालित कार तयार केली जात आहे. ही कार स्टॅनफाेर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तयार करीत आहेत.या कारला फाॅ्नस पसात-2006 असे नाव देण्यात आले असून, व्यावसायिक नाव राेबाे कार ज्युनियर असे असल्याचे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. माईक माॅन्टमाेरियाे यांनी सांगितले. जपानच्या कार उत्पादक निस्सान, टाेयाेटा, मित्सुबिशी, हाेंडा, मझदा आदी कंपन्यांनी त्यांच्या नव्या माॅडेलमध्ये जीपीएसची सुविधा बसविण्यात आली आहे. त्यात मायक्राे इले्निट्रक सामग्रीचा समावेश असून, मिनी एअर टीव्ही, एएम-एफएम रेडिओ, काॅम्पॅ्नट डिस्क आणि सीडी प्लेयरचाही समावेश आहे. संगणक संचालित अँटिनादेखील आहे.सध्या 12 लाखांपेक्षा जास्त कारमध्ये ही सुविधा बसविण्यात आली आहे.