देव आनंद यांच्या चित्रपटांतील गाण्यांची आजही रसिकांवर माेहिनी : राज्यपाल बैस

21 Nov 2023 16:18:51
 

Movie 
 
ज्येष्ठ अभिनेते देव आनंद भारतीय चित्रपटविश्वातील दंतकथा हाेते. आपल्या करिष्माई व्य्नितत्वाने; तसेच अभिनय काैशल्याने त्यांनी जनमानसावर अमीट छाप निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांना दशके लाेटली, तरी आजही त्यांच्या चित्रपटांतील गाणी रसिकांच्या जिभेवर आहेत.भारतीय चित्रपटांच्या सुवर्ण युगनिर्माते हाेते,’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘के दिल अभी भरा नहीं...’ या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करताना राज्यपाल बाेलत हाेते. गेल्या काही वर्षांत गुणगुणता येतील अशी गाणीच निर्माण हाेत नाहीत. संगीताच्या नावाखाली जे काही निर्माण हाेत आहे ताे केवळ कल्लाेळ आहे, अशी खंतही राज्यपालांनी व्य्नत केली.
 
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसने लाहाेरला गेले हाेते. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देव आनंद यांना घेऊन यावे, असे अटलजींना सांगितले हाेते. त्यानुसार अटलजी देव आनंद यांना घेऊन लाहाेरला गेले हाेते, अशी आठवणही राज्यपालांनी सांगितली.देव आनंद यांच्यावरील या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन ऑल इंडिया असाेसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या पुढाकाराने करण्यात आले. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष अजय रुईया, कझाकिस्थानचे मानद वाणिज्यदूत महेंद्र सांघी, काेरस इंडियाचे अध्यक्ष आनंद थिरानी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, गायक अनुप जलाेटा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0