‘टीका’ हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात कटू आठवणी जागृत हाेतात. काही कारण नसताना, आपली चूक नसताना काेणीतरी आपल्यावर केलेली शेरेबाजी, व्यक्त केलेले वाईट मत, अशा भावना या शब्दातून आठवतात. अकारण झालेली टीका वाईटच असली, तरी आपल्याला सुधारणेची ती एक माेठी संधी असते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. आपण टीकेकडे कसे पाहताे यावर ते ठरते. टीकेमुळे आपल्याला नाेकरी-व्यवसाय अथवा नातेसंबंधांतील वस्तुस्थिती समजते.आपल्यातील त्रुटी समजेपर्यंत त्या दूर करता येत नसल्यामुळे टीका त्यासाठी मदतच करते.पण, बहुतेक लाेक टीका व्य्नितगत पातळीवर घेतात आणि ताे आपल्यावरील हल्ला मानतात. या स्थितीत आपण टीकेला शरण जाताे किंवा दुर्लक्ष करताे. पण, याेग्य टीका अनेकांना करता येत नाही.
टीका म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपण ‘टीका’ या शब्दाचे दाेन अर्थ घेताे. पहिला म्हणजे, काेणाची तरी नाराजी, असमाधान अथवा दुसरा म्हणजे, एखाद्या कृतीचे केलेले विश्लेषण. खरेपण असेल, तर वाईट टीकासुद्धा मदतशील ठरते. उदा. एखाद्याने आपल्याला आपले कपडे चांगले नसल्याचे सांगणे म्हणजे आपल्याबाबत काही सांगण्यासारखे त्याच्याकडे असणे. कामाच्या जागी याेग्य कपडे आवश्यक असतात आणि आपण तसे घातलेले नसतील, तर त्या व्यक्तीने आपल्याला ही चूक लक्षात आणून दिलेली असते. म्हणजे, ही टीका चांगल्या हेतूने केलेली असते. आपल्यातील त्रुटी समजणे असाही तिचा अर्थ हाेताे.
वाईट टीका : वाईट शब्दांत काेणाला बाेलणे हे या टीकेचेस्वरूप असते. ‘तू मूर्ख आहेस,’ किंवा ‘तुला काही कळत नाही,’ अशासारखे शब्दांतून याचा प्रारंभ हाेताे. तुमचा अपमान करणे हाच या टीकेचा हेतू असताे. मात्र, इतरांवर अशी टीका करणारे लाेक स्वत:ला असुरक्षित मानतात आणि त्यांच्यात आत्मसन्मान कमी असताे.स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नसल्याने अशी टीका हे लाेक करतात.सकारात्मक टीका आपले शिक्षक अथवा वरिष्ठांकडून हाेणारी टीका यात येते. असे लाेक आपल्याला टीकेतून जीवनातील माेलाचे धडे देत असतात. टीका करण्याचा त्यांचा उद्देश बहुधा चांगला असताे.तुमच्यातील त्रुटी दाखवून त्या सुधारण्याची संधी त्यामुळे मिळते. या टीकेमुळे आपल्याला व्य्नितगत विकास साधता येताे.
संमिश्र टीका : चांगल्या आणि वाईटचा संगम म्हणजे ही टीका. ती करणारे लाेक तुम्हाला मदत करू इच्छितात, पण त्याचवेळी ते तुम्हाला दडपायलाही बघत असतात. काही वेळा आई-वडील अशी टीका करतात. टीकेआडून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याचा हेतू त्यामागे असताे.
आत्मालाेचना : आपण स्वत: फार चांगले नसल्याचे अनेकांना वाटते. आपली तुलना इतरांबराेबर केल्यामुळे असे घडते. मात्र, ही टीका तुम्हाला प्रगतीची संधी देते. त्यामुळे आपण आपल्या भावना नियंत्रणात ठेवू शकताे.टीका याेग्य असते का? हे ठरविणे साेपे नाही. तुमच्या वरिष्ठांनी केलेली टीका तुम्हाला सुधारणेची संधी देते आणि त्यामागे त्रुटी दाखविण्याचा हेतू असताे.टीका कशी घ्यावी हे आपल्यावर अवलंबून असते. मात्र, जीवनात पुढे जाण्यासाठी आपल्यातील त्रुटी समजणे गरजेचे असते आणि ते काम टीकेमुळे हाेते हे लक्षात ठेवा.