फेशियल करण्यापूर्वी ही दक्षता घ्या

    18-Nov-2023
Total Views |
 
 

Facial 
 
चेहऱ्याच्या स्नायूंना टाेनिंग करण्यासाठी, सुरकुत्या टाळण्यासाठी फेशियल करवून घेणे अत्यंत गरजेचे असते. फेशियल याेग्य प्रकारे न झाल्यास आपला फायदा हाेण्याऐवजी नुकसान हाेऊ शकते. हे टाळण्यासाठी खालील दक्षता घ्या.
 
1. ज्या ठिकाणी डाॅ्नटर वा काउंसलर आपली त्वचा तपासून काेणत्या प्रकारचे फेशियल आपल्यासाठी याेग्य ठरेल हे सांगत असेल तिथेच फेशियल करून घ्यावे.
2. आपल्याला एखादी अ‍ॅलर्जी असेल तर ती लपवू नये.कारण त्यामुळे आपल्याला त्रास हाेऊ शकताे. तसेच जर आपल्याला एखादी शारीरिक व्याधी असेल वा एखादा आजार असेल तर ताेही आपल्या काउंसलरला सांगावा. ताे आपल्याला याेग्य सल्ला देईल.
 
3. पार्लर वा ्निलनिकमध्ये फेशियल करताना वापरण्यासाठी दिलेला गाउन नीट स्वच्छ केलेला आहे ना हे पाहून घ्या. बऱ्याचदा एकच गाउन अनेक ्नलायंटसाठी वापरला जाताे. जाे आपल्या आराेग्यासाठी हानिकारक ठरू शकताे.
 
4. तसेच आपल्याला दिलेल्या बेडवरील बेडशीटही स्वच्छ व डिस्पाेजेबल आहे ना हेही पाहावे. तसे नसेल तर ते करण्यास सांगावे.
 
5. आपले फेशियल करीत असलेल्या ब्यूटिशियनने त्याचे हात व्यवस्थित धुतलेले आहेत ना हेही पाहावे.
 
6. फेशियल करताना ब्यूटिशियनच्या स्टेप्स वरच्या दिशेने असाव्यात. चुकीच्या दिशेने हात चालवल्यास त्वचा खराब हाेण्याची श्नयता असते.
 
7. आपली ब्यूटिशियन आपल्या चेहऱ्यासाेबत मानेला व त्याखालीही मसाज करते आहे ना हे पाहावे.
 
8. मसाज करताना आपल्या ब्यूटिशियनच्या हाताचा आपल्या शरीरावर अत्यंत हलका दाब असावा.
 
9. फेशियल करून घेण्यापूर्वी आपल्या फेशियलसाठी काेणत्या मशिन वापरल्या जाणार आहेत याची माहिती घ्या. पॅक लावलेला असताना काेणत्याही प्रकारच्या गप्पा मारू नयेत.