घरातलं वातावरण सकारात्मक करा!

    17-Nov-2023
Total Views |
 
 

Home 
तुमच्यातल्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम थेट तुमच्या घरावर सुद्धा हाेत असताे. त्यामुळे घरातलं वातावरण नेहमी आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.सकारात्मक ऊर्जा असणारी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्ती काेणत्याही अवघड प्रसंगाला सहज ताेंड देऊ शकते. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्या घरावर हाेत असताे. घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असावं. वर्षातून दाेनदा तरी घराची संपूर्ण स्वच्छता केली जावी. जे सामान लागत नसेल ते तत्काळ घरातून काढून टाका.यामुळे घरात विनाकरण पसारा हाेणार नाही. त्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक वातावारण तयार हाेतं.
 
घरात वस्तू काेंबून ठेवू नका. जे आवश्यक आहे त्याच सामानाची खरेदी करा. यामुळे घर नीटनेटकं राहील. घराच्या खिडक्या बंद ठेवू नका.त्यामुळे घरात माेकळी हवा खेळणार नाही. घरात साचलेली रद्दी लवकर विकून टाका.महिन्यातून एकदातरी संपूर्ण फर्निचर हलवून तिथे जमा झालेली धूळ साफ करा. शिवाय गरज असेल तर तुम्ही फर्निचरची जागा बदलून बघा.जर तुमच्या घरात व्यवस्थित जागाअसेल तर गॅलरीत ुलझाडं आणि छाेटी राेपटी लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल.घरात पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू असाव्यात याचा विचार करा. घरातला कचरा ओला आणि सुका असा वेगळा असावा. ओल्या कच-पासून तुम्हांला घरात खत तयार करता येईल, जे तुम्हांला झाडांकरता वापरता येईल.