समाेरच्या व्यक्तीबराेबर असलेले सख्य सतत सिद्ध करण्यासाठी लागणारे प्रचंड यत्न हेच अनेकांच्या समस्येचे मूळ असते.आपण प्रेम खूप अवास्तवपणे व्यक्त करताे.आपण प्रेम खूप अधिक व्यक्त करताे, तेव्हा कालांतराने अजून व्यक्त करण्याजाेगे काही उरत नाही. अरे, तू फारच सुंदर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे तुम्ही म्हणू शकता.हे केवळ शब्द झाले, नुसते विचार.आतमध्ये काही हाेत नाही आहे. माझ्या प्रेमाला ते जबाबदार आहेत, असे आपण म्हणत नाही. माझ्या प्रेमाकरिता मीच जबाबदार आहे. मला आज प्रेमाची भावना हाेते आहे. कदाचित उद्या प्रेम जाणवणार नाही. स्वतःवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे उत्क्रांतीच्या मार्गावर जाणे. मग आपण विचार करू शकताे, सर्वकाळ, आयुष्यभर मी प्रेमात कसे काय असू शकताे. तेव्हा आपल्या हृदयावरचे आणि मनावरचे आंतरिक अवजड ओझे उतरते. तुम्हाला इतरत्र प्रेम सापडते तेव्हा सतत त्याबद्दल विचार करीत राहता.तुम्ही त्यांची काळजी, त्यांच्याबराेबर असलेले तुमचे सख्य टिकवायचा प्रयत्न करता.
माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे अमक्या तमक्याला पटवून देण्याची आवश्यकता नाही. खरे सख्य ते आहे ज्यामध्ये तुम्हाला जवळीकता आधीपासून वाटते. तुम्हाला ती कुणाला सिद्ध करून देण्याची किंवा जवळीकता आणण्याचे प्रयत्न करण्याची गरज नाही. प्रेम खूप अधिक प्रमाणात व्यक्त केले की ते अल्पायुषी हाेते. ते एका बीजाप्रमाणे असते. तुम्हाला ते पेरायचे असते आणि त्याला तसेच पुरलेले ठेवायला पाहिजे.कधीही जास्त व्यक्त करू नये. तुम्ही कुणावरही प्रेम करा; पण ते असे करा की त्यांना त्याचा पत्तासुद्धा लागणार नाही. ते एक गुपित ठेवा. तुमच्या कृतींमधून तुमचे प्रेम फुलू द्या. सतत माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हटल्याने तुम्ही त्याचा चुराडा करता.एखादी साक्षात्कारी व्यक्ती, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, असे म्हणणार नाही.अशा व्यक्तीच्या उपस्थितीतच तुम्हाला प्रेम जाणवेल. प्रत्येक श्वासात प्रेम असेल. प्रत्येक कटाक्षात प्रेमाची अनुभूती येईल. उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकाल, तर ताे प्रेमाने ओतप्राेत असेल.