कन्या

14 Nov 2023 22:18:28
 

Horoscope 
 
तुमच्या मनात या आठवड्यात निरनिराळ्या विचारांचे काहूर माजेल. तुम्ही त्या विचारांमध्येच हरवलेले राहाल. बाैद्धिक कामे करावी लागतील; पण वादात पडू नये.विशेषत: आई व जाेडीदाराच्या विषयात जास्त भावुक राहाल. प्रवासयाेग आहे पण श्नयताे प्रवास टाळावा.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक कामे तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी वाढवण्याची आवश्यकता आहे. या काळात निर्णय विचारपूर्वक घेणे याेग्य ठरेल.हाताखालील मंडळी तुम्हाला कमी सहकार्य करतील. याउलट अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमची अडलेली कामे पूर्ण करू शकाल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात एखादा शुभसमारंभ संपन्न हाेण्याची श्नयता आहे. जाेडीदाराकडून संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला जाऊ शकताे; पण तुमच्याकडूनच याबाबत त्रास उद्भवण्यची श्नयता दिसून येते. शेजारी व नातेवाइकांमार्फत कामे पूर्ण हाेऊ शकतात.
 
 आराेग्य : तुम्हाला पाेटदुखी, गॅसचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. दूषित पाण्यामुळे समस्या वाढू शकतात. प्रवासात बेसावध राहिल्यामुळे गैरसाेय हाेऊन मानसिक ्नलेशाची श्नयता आहे. जास्त साहसी व जाेखमीच्या कामांपासून स्वत:ला दूर ठेवावे.
 
 शुभदिनांक : 12, 15, 16
 
 शुभरंग : हिरवा, निळा, अभ्रकी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम; गुंतवणुकीपूर्वी चाैकशी करावी.
 
 उपाय : घरात काटेरी राेपे व झाडे लावू नयेत. फळझाडे लावल्यास बुध ग्रह अनुकूल राहील.
 
 
Powered By Sangraha 9.0