या आठवड्यात आर्थिक बाबतीत याेग्य याेजना बनवू शकाल. इतर लाेकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. प्रत्येक काम यशस्वीपणे पार पडेल.व्यापारविषयक याेजना आखाल. आनंदात आठवडा जाईल. व्यापारासाठी प्रवास घडेल. उच्च पदाधिकाऱ्यांकडून फायदा मिळेल. बढती, मानसन्मानाचे याेग आहेत.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रातील अडथळे कमी हाेतील. याकाळात तुमच्यात उत्तम बाैद्धिक क्षमता राहील. कामे वळेत पूर्ण करण्याच्या चिंतेपायी तुमच्या मनात नैराश्य येईल. या काळात विदेशात जाॅब मिळवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी हाेऊ शकताे.
नातीगाेती : या आठवड्यात जाेडीदारावर रागावणे टाळा. आई आणि तुमचे विचार एकमेकांपेक्षा वेगळे असू शकतात; पण वडिलांचे प्रेम आणि मदत तुम्हाला मिळेल. नवे मित्र तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीवर परिणाम करू शकतात. या काळात तुमच्यामध्ये हटवादीपणा राहू शकताे.
आराेग्य : या आठवड्यात मानसिक अस्थिरतेमुळे तुम्ही असंतुष्ट राहाल.घरातील व्य्नतींचे आराेग्य सांभाळणे तुमची जबाबदारी आहे. त्यात बेपर्वाई करू नये. कामकाजामुळे काहीसा थकवा जाणवू शकताे. मुलांची तब्येत सांभाळावी.पडसे असल्यास वाफारा घेऊ शकता.
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : काळा, पांढरा, लाल
शुभवार : बुधवार, गुरुवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात तुम्ही रागापायी स्वत:वरील ताबा गमावू नये.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी लाल कपड्यात दाेन मूठ मसूरडाळ बांधून एखाद्या भिकाऱ्याला दान द्या