वृश्चिक

    14-Nov-2023
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा आर्थिक, व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर राहील. धनलाभासाेबत दीर्घ काळासाठी पैशाचे नियाेजन करू शकाल. व्यापार करीत असाल, तर ताे वाढवण्याची याेजना बनवू शकाल. तनमनाने फ्रेश जाणवाल. मित्रमंडळी व स्वकीयांसाेबत आनंदात आठवडा घालवाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला बढतीची श्नयता आहे.त्यासाेबतच तुम्हाला परदेशवारीही घडू शकते. हाताखालील मंडळींच्या सहकार्यामुळे तुम्ही उत्साही राहाल. व्यापाराची सुरुवात करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.आत्तापर्यंत रखडलेली बढती यावेळी मिळेल.
 
 नातीगाेती : हा आठवडा जाेडीदारासाेबत परदेशभ्रमंतीसाठी अनुकूल दिसत आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या मित्रांसाेबतही फिरायला जाण्याची याेजना बनवाल.यामुळे तुमच्या संबंधांमध्ये एक नवी ऊर्जा येईल. घरातही अनेक नव्या वस्तू खरेदी कराल. मुलांसाेबत मजेत वेळ घालवाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याचा विचार करीत नियमितपणे व्यायाम करावा आणि सकाळी अवश्य फिरायला जायला हवे. ज्यामुळे तुमचे स्नायू लवचिक राहतील आणि शरीरात उत्साह जाणवेल. त्यामुळे तुमच्या आराेग्याला एक नवीच झळाळी लाभेल.
 
 शुभदिनांक : 13, 14, 18
 
 शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : मन जास्तीत जास्त एकाग्र व अंकुशित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 
 उपाय : पिंपळाच्या मुळाजवळ सरसू तेलाचा दिवा लावावा. गरीब, वृद्ध व नाेकरांशी अपमानास्पद वागू नये.