या आठवड्यात अविचारी बाेलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे असे आचरण टाळावे. व्यावसायिकासाेबत उग्र वाद हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे बाेलण्यावर ताबा ठेवावा. वादविवादात अडकू नये. काेर्टकचेरीच्या कामात सावधगिरी बाळगावी. नातलगांशी वादाचे याेग आहेत.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक कामांसाठी कर्ज मिळवाल.मनाजाेग्या जागी बढतीसाेबत बदलीही मिळवू शकाल. आर्थिक बाबींमध्ये अनुभवी व्य्नतींची मदत मिळवू शकता. अधिकाऱ्यांनी तुमच्या त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा त्रास कमी हाेईल. तुमच्या याेजनांना उशीर लागू शकताे.
नातीगाेती : या आठवड्यात जाेडीदाराचे वागणे तुमच्यासाेबत याेग्य राहणार नाही. तुम्ही स्वत:मध्ये सहनशीलतेची भावना राखल्यास गाेष्टी दीर्घकाळासाठी ताणल्या जाणार नाहीत. मतभेदाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकताे. या काळात मानसिक चिंता वाढू शकतात. नातलगांशी वाद घालणे टाळा.
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या आराेग्याची स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमच्या रागावर व मनमानी वागण्यावर अंकुश लावायला हवा. कामाची दगदग व कुटुंबातील वाद यामुळे मानसिक असंताेष अनुभवाल. छातीत दुखण्याचा त्रास संभवताे. सकाळ-संध्याकाळी हलकाफुलका व्यायाम करावा.
शुभदिनांक : 13, 14, 18
शुभरंग : लाल, गुलाबी, पिवळा
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात शिळे अन्न, कापलेली फळे व दूषित जेवण करू नये.
उपाय : या आठवड्यात उडीद एखाद्या भिकाऱ्याला द्यावेत वा कावळ्यांना खाऊ घालावेत.