मीन

    14-Nov-2023
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात मित्र-स्वजनांच्या भेटीगाठी हाेतील. प्रियजनांकडून सुख-आनंद लाभेल. पर्यटनासाठी मित्र व कुटुंबासाेबत याेजना बनवू शकता. मनात प्रसन्नता राहील. केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याचे याेग आहेत. नाेकरी वा व्यापारात प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवू शकाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात नाेकरीत बदल करण्याचा विचार करू शकता. प्रयत्न करीत राहिल्यास हे काम पूर्ण हाेऊ शकेल. अडलेली कामे कुशलतेने पूर्ण करू शकाल. शासकीय कामातील तुमच्या याेग्यतेत वाढ हाेईल. यश मिळवल्यामुळे तुमचा आत्मविश्वास परतून येईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात जाेडीदारासाेबत कमी अंतराचा प्रवास करू शकता.कुटुंबाबाबतच्या तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे याेग्य ठरेल. मुलांच्या यशामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आप्तेष्टांच्या एखाद्या संबंधात काहीसा कडवटपणा येऊ शकताे.काेर्टकचेरीपासून दूर राहणे हितकर ठरेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात शारीरिक परिश्रमही हवेत. जास्त आराम केल्यामुळे डाेकेदुखी, पाेटदुखी सतावू शकते. जेवणाकडे जास्त लक्ष द्यावे. गुडघे व सांधेदुखीपासून आराम मिळू शकताे. सकाळी व्यायाम करावा. जास्त फायदा हाेईल.सकाळी एक ग्लास काेमट पाण्यात लिंबूरस व मध मिसळून पिणे उत्तम.
 
 शुभदिनांक : 12, 14, 18
 
 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात नाेकरांसाेबत अपमानास्पद वागू नये.
 
 उपाय : मंदिरातील केळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावावा