वृत्तपत्र विक्रेत्यांकडून समाज सक्षमीकरण: सिद्धार्थ गाडगीळ

    14-Nov-2023
Total Views |
 
 

Newspaper 
‘वृत्तपत्र वितरण करणे फार जबाबदारीचे व कष्टाचे काम आहे. आपण ते अनेक वर्षे करत आहात, यापुढेही करत राहाल. समाजातील चांगल्या घडामाेडी, सकारात्मक गाेष्टी समाजापर्यंत पाेहाेचवून समाज सक्षमीकरणाचे काम आपण करत आहात. हे काम असेच चालू ठेवा.आपल्या मदतीसाठी गाडगीळ परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभा असेल,’ असे आश्वासन पीएनजी सराफ पेढीचे संचालक व आमदार सुधीर गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी दिले.आमदार गाडगीळ यांच्या वतीने सिद्धार्थ गाडगीळ यांनी वृत्तपत्र विक्रेता भवन येथे येऊन सांगली-कुपवाड परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई यांनी स्वागत केले.
 
नवलाई यांनी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विविध उपक्रम व कार्याची माहिती दिली.विकास सूर्यवंशी म्हणाले, ‘आमदार गाडगीळ यांनी सतत वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार दिला. महापुराच्या काळापूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेता कुटुंबांना सर्वांत प्रथम मदत देणारे आमदार गाडगीळ आहेत. त्याचबराेबर वेळाेवेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार देण्याचे काम गाडगीळ यांनी केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे आधारस्तंभ म्हणून ते कायम आमच्या पाठीशी आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’ सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असाेसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय सरगर, सरचिटणीस विशाल रासनकर, खजिनदार अमाेल साबळे, मनपा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक वाघमारे, सांगली शहराध्यक्ष सागर घाेरपडे, प्रताप दुधारे, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब पाेरे यांच्या हस्ते गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.
 
विमल काळाेखे, साै. कदम, बापू गावडे, सुनील कट्टप्पा, गणेश कटगी, दीपक सूर्यवंशी, राजाराम चिंदगे, महेश वैद्य, कैलास सूर्यवंशी, बंदेनवाज मुल्ला, आर. एस. माने, नागेश काेरे, नारायण माळी, राजू गडदे, बजरंग यमगर, श्रीकांत दुधाळ, श्रीपती रासनकर, प्रदीप आजगावकर, संजय कांबळे, राजू कांबळे, विजय कांबळे, आनंदा माेरे, संभाजी पाटील, समित मेहता, विनाेद पाटील, सुभाष चाैगुले यांच्यासह सर्व वृत्तपत्र विक्रेते माेठ्या संख्येने यावेळी उपस्थित हाेते. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दरिबा बंडगर यांनी आभार मानले.