मायग्रेन रुग्णाने जर शरीराला मानसिक आणि शारीरिक पातळीवर ढिले साेडून एकांतामध्ये राहिल्यास किंवा हल्नया डाेसचे औषध घेतल्यासही लगेच आराम मिळू शकताे.डाे्नयाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस जेव्हा डाेके दुखायला लागते, तेव्हा त्याला मायग्रेन म्हणतात. या भयानक यातना देणाऱ्या वेदना सूर्य उगवत असताना सुरू हाेतात.जसजसे सूर्य वरती चढत जाताे तसतसे वेदनाही वाढत जातात. दुपारच्या वेळी या वेदना खूप तीव्र असतात. परंतु जसजसा सूर्य पश्चिमेकडे जाताे तशा वेदनाही कमीकमी हाेत जातात.अमेरिकेत जवळजवळ 10% जनसंख्या मायग्रेन आजाराने त्रस्त आहे. हा आजार युवकांमध्ये जास्त आढळताे. यामध्ये मेंदूच्या नसा एकावर एक पसरल्याने हे उत्पन्न हाेते. काही कुटुंबामध्ये हे आनुवंशिक असते.
सामान्य उपचार : मायग्रेन झाले असल्यास - काेणतेही काम करू नये. एका शांत खाेलीत जाऊन आराम करणे. वेदना हाेत असल्यास तुमच्या डाॅ्नटरांनी ज्या गाेळ्या आणि औषधे सुचविले असतील त्या वेळेत घ्यावीत. तुम्ही एर्गटचे औषधही घेऊ शकता.एका दिवसात 6 गाेळ्यांपेक्षा अधिक घेऊ नये. अन्यथा एर्गटचा कुप्रभाव हाेऊ शकताे.
हे करून पाहा - संपूर्ण झाेप घ्यावी. चाॅकलेट, मद्यपानाचे सेवन करू नये.जर रुग्णाला महिन्यातून एकदा किंवा जास्त वेळा डाेके दुखत असेल तर लगेच उपचार सुरू करावेत.
मायग्रेन हाेण्याची कारणे - उच्च र्नतदाब, ब्रेन ट्यूमर, साइनूसाइटिस, मानसिक दबाव, चिंता आणि आवसाद, ब्रेन हॅमरेज, मासिक पाळी इत्यादी कारणांनी मायग्रेन हाेण्याची श्नयता आहे.
असेही हाेत असते - रुग्ण अंधारातच राहू इच्छिताे. या वेदना तीव्र प्रकाशात आणि जास्त आवाजाने वाढतात.डाेकेदुखी 4 ते 72 तासांपर्यंत राहते.