तूळ

    14-Nov-2023
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमच्या बाेलण्याने तुम्ही काेणालाही मंत्रमुग्ध कराल. तुमच्या वैचारिक समृद्धीत वाढ हाेईल. तुमचे मन प्रफुल्लित राहील. तुम्ही काेणतेही शुभकार्य करण्यासाठी प्रेरित व्हाल. व्यवस्थित याेजना बनवण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. तुम्ही धार्मिक पुण्याचे काम कराल.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा व्यापारी करार करण्यास अनुकूल आहे. भागीदारीच्या कामकाजात यशाचे याेग बनलेले आहेत. वरिष्ठांचे आचरण तुमच्यासाठी अनुकूल नाही. तसेच हाताखालील व्य्नतींनाही एकच काम वारंवार समजावून सांगावे लागेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी हाेतील.
 
 नातीगाेती : हा आठवडा दांपत्यजीवनासाठी अनुकूल राहणारा नाही. राग उत्पन्न करणारे वाद हाेण्याची श्नयता आहे. शांतचित्ताने बाेलून समस्या साेडवण्याचा प्रयत्न करावा. सध्या काेणाही नातेवाइकाला पैसे उसने देणे टाळावे. अन्यथा ते परत मिळण्याची श्नयता कमी असेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनातील विचार दाबण्यासाठी एखाद्या आनंददायक कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करावा. विराेधक तुमचा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. काेणत्याही वादाच्या मुद्यापासून दूर राहावे.स्वत:ची तब्येत जपावी. गाजर खा, यामुळे राेगप्रतिकारक्षमता वाढते.
 
 शुभदिनांक : 12, 15, 16
 
 शुभरंग : हिरवा, निळा, अभ्रकी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : वायफळ खर्च टाळून पैसा वाचवण्याचा प्रयत्न करावा.
 
 उपाय : कणकेच्या लाटीत हरभराडाळ, गूळ व हळद टाकून गायीला खाऊ घालावे.