सिंह

    14-Nov-2023
Total Views |
 
 

Horoscope 
तुम्हाला तुमची आप्तेष्ट मंडळी भेटल्यामुळे आनंद हाेईल. त्यांच्यासाेबत असलेल्या प्रेमळ संबंधाने तुमचा आनंद वाढेल.प्रतिस्पर्धकांसमाेर तुम्ही ठामपणे उभे राहाल.उत्साह आणि कल्पकतेने परिपूर्ण हाेऊन तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यामध्ये आत्मविश्वास जास्त राहिल्यामुळे कठीण, माेठ्या याेजनांवर काम करीत राहाल. तुमच्या उत्पन्नावरही परिणाम हाेईल. तुम्ही कठाेर बाेलणे कमी केल्यामुळे तुमच्या कामांमध्ये तुम्हाला मदतही मिळेल. नवे व्यावसायिक स्राेत बनवू शकता.
 
 नातीगाेती : या आठवड्यात मित्रांची मदत मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त त्रासाचा सामना करावा लागू शकताे. मधल्या काळात तुमचे तुमच्या मित्रांसाेबतचे संबंध सुधारू लागतील. याशिवाय या काळात तुम्ही दांपत्यजीवनात क्राेध करणे टाळावे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमच्या आचरणात काेमलता हवी. जास्त ताण घेऊ नका. तुम्ही तुमचा त्रास माेकळेपणाने व्य्नत करू न शकल्यामुळे मनातल्या मनात त्यामुळे त्रास हाेत राहील. श्नय असल्यास मेडिटेशन, याेगाची मदत घ्यावी.कारल्याचा रस व लिंबाचा रस सकाळी घेतल्यास चरबी घटेल.
 
 शुभदिनांक : 12, 14, 18
 
 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नये. विशेषकरून जाेडीदाराच्या निर्णयांमध्ये. एखादी गाेष्ट न पटल्यास प्रेमाने समजवावे.
 
 उपाय : या आठवड्यात घरात तुळस लावा. संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावल्यास लक्ष्मीमाता कधीही घरातून जात नाही.