पत्नीला भेटवस्तू देण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत

    14-Nov-2023
Total Views |
 
 
Gift
 
ज्वेलरी, पर्ल सेट
 
लहान-माेठ्या प्रसंगी तुम्ही साेन्याचे दागिने तर पत्नीला भेट म्हणून देतच असाल. पण आता व्हाइट गाेल्ड, प्लॅटिनम, डायमंड किंवा पर्ल सेट बाजारात मिळतात आणि ते भेट म्हणून देता येऊ शकता. यामुळे पत्नीच्या ज्वेलरी कले्नशनमध्ये नवीन प्रकारची स्टायलिश आणि ट्रेण्डी ज्वेलरी वाढल्याने तुमच्या लाइफ पार्टनरच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमलेल.
 
इले्नट्राॅनिक गॅजेट्स
 
पत्नी टे्ननाेसेवी असावी असे वाटत असेल, टे्ननाेलाॅजीच्या नवनवीन गॅजेट्सने ती अपडेटेड असावी तर यासाठी या वेळी तुम्ही त्यांना स्मार्ट फाेन, आयपॅड, टॅबलेट, लॅपटाॅप, हॅण्डीकॅम,यासारखे गॅजेट्स मार्केटमध्ये सहज मिळतात. तुम्हाला जर तुमचे सुंदर क्षण टिपून ठेवायचे असतील तर हॅण्डीकॅम एक चांगलं गिफ्ट ऑप्शन ठरेल.
 
इले्निट्रक बाइक तुम्ही तुमच्या पत्नीला इले्निट्रक बाइकही गिफ्ट देऊ शकता. इले्निट्रक बाइकमुळे त्यांचा आत्मविश्वासच वाढणार नाही, तर त्या आत्मनिर्भरही हाेतील. मुलांना शाळेत नेणं-आणणं असाे, ऑफिसला जाणे असाे वा घरातील इतर कामं पूर्ण करायची असाे, तुमचं हे युनिक गिफ्ट त्यांना खूप उपयाेगी पडेल.
 
वेइंग मशीन
 
तुम्हाला जर तुमची पत्नी स्लिमट्रिम आणि माॅडेलसारखी दिसावी असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना भेट द्या वेइंग मशीन.जेणेकरून त्याच्या वापराने त्या आपल्या वाढणाऱ्या किंवा कमी हाेणाऱ्या वजनावर लक्ष ठेवून स्लिमट्रिम राहतील. आता बाजारात ऑटाे ऑन अ‍ॅण्ड ऑफ फॅसिलिटीच्या प्लॅस्टिक आणि ग्लास प्लेट फार्मच्या अनेक वेइंग मशीन्स मिळतात, ज्यामध्ये एलईडी इंडिकेटर लाइट, एलसीडी डिस्पले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
 
एअरकंडिशनर
 
जेव्हा बाहरेचं वातावरण गरम असेल तेव्हा बेडरूमचा मूड थंड करण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला एसी गिफ्ट करू शकताकाेणत्याही माेसमात तुम्ही एसी गिफ्ट केली, तरी चालू शकते.एसी त्यांचा मूड चांगला राखेल आणि त्या कायम दिसतील फ्रेश आणि आनंदी, ज्याचं संपूर्ण श्रेय मिळेल तुम्हाला. आता बाजारात विंडाे एसी आणि स्प्लिट एसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता पावसाळा सुरू झालेला आहे. अशा काळात एसीचे मार्केट डाऊन असते. तेव्हा तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकताे.
 
किचन टेलिव्हिजन
 
तुम्ही तुमच्या पत्नीला किचनमध्ये आपल्या आवडीचे पदार्थ बनवताना आपल्या आवडीचे चित्रपट आणि कार्यक्रम पाहण्याचीही संधी देऊ शकता आणि तेही किचन टेलिव्हिजन गिफ्ट करून. विश्वास ठेवा, हे त्यांच्यासाठी एक सुखद सरप्राइज ठरेल.
 
सुरक्षा यंत्रणा
 
भेट म्हणून तुम्ही पत्नीला स्नियुरिटी सिस्टीम देऊ शकता.स्माेक इंडिकेटर, आगीपासून संरक्षण, अनाेळखी लाेकांना ओळखल्यानंतर घरामध्ये एंट्री करणाऱ्या या स्नियुरिटी सिस्टीममध्ये फिंगर प्रिण्ट लाॅ्नस, बिनचावीचे दार उघडण्याची साेय म्हणजे डुप्लीकेट चावी बनवण्याचं ऑप्शनच नसणार, व्हिडिओ डाेर फाेन, टू वे कम्युनिकेशन, स्पीकर सिस्टीम, आतून इले्नट्राॅनिक लाॅक उघडण्याची साेय इत्यादी बरंच काही बाजारात उपलब्ध आहे. यातून तुम्ही घराच्या परिपूर्ण सुरक्षेची व्यवस्था करू शकता.