या आठवड्यात लेखनप्रवृत्ती वा साहित्याशी संबंधित काम व्यवस्थित पार पाडाल. यासाठी याेजनाही बनवू शकता. सरकारी कामांमधील परिस्थिती काहीशी प्रतिकूल असल्याचे जाणवेल. याशिवाय या काळात तुमच्या भागीदारांसाेबत तणावाची स्थिती राहू शकते. या काळात अधिकाऱ्यांचे सहकार्य कमी मिळेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला प्रवासांद्वारे लाभाची श्नयता आहे. व्यावसायिक विषयात जाेडीदाराचा सल्लाही घेऊ शकता. तुमच्या पद व कमाईत वृद्धी हाेण्याची श्नयता आहे. सहकाऱ्यांकडून तुम्हाला याेग्य सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही तुमच्या कामात प्रगती करू शकाल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे दांपत्यजीवन आनंदी, सुखसमाधानाने भरलेले राहील. तुमच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विशेष खर्च कराल. या काळात तुमचे तुमच्या आईशी असलेले संबंध सुधारतील. मित्रांवर जास्त विसंबून राहू नये.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. थाेडासा थकवा जाणवू शकताे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. महिलांनी स्वत:ची तब्येत सांभाळावी. कारण हवामान बदलाचा त्यांच्यावर परिणाम हाेऊ शकताे. खाेकला व दुर्गंंधीयु्नत श्वासासाठी लवंग व बडीशेप उपयु्नत आहे.
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : हिरवा, निळा, अभ्रकी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात बाेलण्यापूर्वी शब्दांकडे लक्ष द्यावे. काेणत्याही मुद्यावर मत देताना उत्तेजित हाेऊ नये.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमंताच्या चरणीच्या शेंदराचा टिळा कपाळावर लावून घ्या. माकडांना गूळफुटाणे खाऊ घाला.