या आठवड्यात तुमची वैचारिक समृद्धता वाढेल. फायदेशीर आणि गाेड नाती तुम्ही तुमच्या मधुर वाणीने बनवू शकाल. व्यावसायिक रूपात हा आठवडा फायदेशीर राहील.आर्थिक लाभ मिळवू शकाल. सुख-आनंद मिळवू शकाल. शुभसमाचार कळतील.आनंददायक प्रवास घडेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात जमीन जुमल्याबाबतच्या क्षेत्रातून फायदा मिळवू शकाल. दैनंदिन कामात जास्त गुंतून राहणे टाळावे. याेजनांची कामे अडू नयेत यासाठी स्वत:त संघर्ष वाढवणे लाभदायक राहील. या काळात अधिकाऱ्यांची साथ लाभेल; पण सहकारी त्रासाचे कारण ठरू शकतात.
नातीगाेती : या आठवड्यात संततिसुखाची इच्छा पूर्ण हाेऊ शकते. काैटुंबिक समस्या सुटण्यासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता. कुटुंबात आनंदी समारंभ झाल्यामुळे आप्तेष्टांना एकमेकांजवळ येण्याची संधी मिळू शकते; पण हा काळ दांपत्यजीवनासाठी फारसा सुखावह असणार नाही.
आराेग्य : या आठवड्यात शत्रूंकडून तणावाची स्थिती उत्पन्न हाेऊ शकते.वातासंबंधित त्रास त्रस्त करू शकताे. जाेडीदाराची तब्बेत जपावी. श्नय असल्यास गरीब गरजूला मदत अवश्यक करावी. दही व मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत.काेंडायुक्त पीठ, भरपूर पिकलेली पपई व ताक प्याल्यास बद्धकाेष्ठता हटेल.
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात मद्यपान व तंबाखू सेवन यापासून दूर राहावे.
उपाय : शनिग्रहाच्या वस्तू दान कराव्यात. शनीची प्रतिकूलता अनुकूलतेत बदलेल.