कर्क

    14-Nov-2023
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्या मनात रागाची भावना राहील. ती दूर केल्यास अनिष्ट गाेष्टी टाळू शकाल. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. बाेलण्यावर ताबा ठेवावा. खर्च वाढल्यामुळे काहीशी तंगी जाणवेल. आध्यात्मिक विचारांनी मन शांत राखावे. मुलांविषयी शुभसमाचार मिळेल. वडिलांकडून लाभ हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. तसेच कामाचा ताणही वाढेल. तुमचे सहकर्मचारी व वरिष्ठ तुमची प्रतिभा जाणतील.त्यामुळे तुम्हीही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यास तयार व्हाल. तुम्ही जाेखीम पत्करून नव्या कामात हात घालू नये.
 
 नातीगाेती : या आठवड्यात दांपत्यजीवनात चढ-उताराची स्थिती आहे.तुम्ही नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. मित्र तुमच्या काैटुंबिक कामांमध्ये तुम्हाला मदत करूशकतात. मुलांवरील वाढत्या खर्चामुळे तुम्ही काहीसे त्रस्त राहू शकता. जाेडीदार व मुलांसाेबत माैजमस्ती कराल.
 
 आराेग्य : या आठवड्यात खेळताना मार लागण्याची श्नयता आहे.त्यामुळे स्वत:साेबतच घरातील मुलांकडेही लक्ष द्या. वाहन सांभाळून चालवावे.वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये. काेणत्याही प्रसंगात स्वत:वर ताबा ठेवावा. रागावू नये. लवंगेच्या तेलात जास्त अँटिऑ्नसाइड त्वचा व शरीर उत्तम राखतील.
 
 शुभदिनांक : 13, 14, 18
 
 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात घरात खंडित व फाटकी धार्मिक पुस्तके व ग्रंथ ठेवू नयेत.
 
 उपाय : या आठवड्यात घरात लाल फुलाचे राेप लावून त्याची देखभाल कर