पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणिसृष्टीचा विस्तार प्रचंड असून, आपल्या या ग्रहावर वनस्पती आणि प्राण्यांच्या सुमारे 8.7 दशलक्ष प्रजाती असल्याचा अंदाज आहे. त्यातील फक्त 1.2 दशलक्ष प्रजातींची माहिती आपल्याला झालेली असून, त्यात बहुसंख्य कीटक आहेत. प्रत्येक प्रजातीचे एक वैशिष्ट्य असते आणि त्यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. जगण्याच्या संघर्षात टिकावयाचे असेल, तर आपला बचाव करणे शिकावे लागते. प्रत्येक जीवाला काेणी ना काेणी शत्रू असताे आणि त्याच्यापासून बचावासाठी त्या जिवांना काही तरी देणगी मिळालेली असते.प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये ‘आर्माडिलाें’चसमावेश हाेताे. ‘सीनगुलाटा’ कुळातील हे प्राणी नव्या जगातील मानले जातात. भक्षकांपासून बचावासाठी यांच्या शरीरावर अभेद्य कातडी असते आणि एखाद्या बुलेटप्रूफ जाकिटाप्रमाणे ती काम करते.
या अत्यंत जाड आणि भक्कम कातडीमुळे आर्माडिलाेंचे भक्षक हताश हाेऊन त्यांना मारण्याचा नाद साेडून देतात. म्हणजेच, ही कातडी या प्राण्याचे संरक्षक कवच आहे. इन्स्टाग्रामच्या एका यूजरने 13 ऑ्नटाेबरला आणि आर्माडिलाेचा फाेटाे आणि व्हिडिओ पाेस्ट केला हाेता. त्याला आतापर्यंत दाेन लाख लाइ्नस मिळाले असून, काॅमेंट्सही भरपूर आल्या आहेत. ‘आर्माडिलाे’ हा स्पॅनिश शब्द असून, ‘लहान चिलखतधारी’ असा त्याचा अर्थ हाेताे. या प्राण्यांच्या त्वचेखालील हाडे वक्राकार असल्याने ती चिलखताप्रमाणे भक्कम असतात.त्वचेवरील खवल्यांमुळे ती जास्त कठीण हाेते. या सर्वांचे मिळून एक मजबूत संरक्षण कवच बनते.
या प्राण्यांची त्वचा अतिनील किरणे परावर्तीत करू शकते. आर्माडिलाेंच्या संपूर्ण शरीरावर या भक्कम त्वचेचे आवरण असते आणि पार्श्वभाग, तसेच खांद्याच्या भाेवताली ती अधिक जाड असते. मात्र, पाेटाकडच्या भागाला हे आवरण नसते आणि तेथील त्वचा नेहमीप्रमाणे मृदू असते. त्यामुळे भक्षकांपासून बचावासाठी या प्राण्यांना कायम पाठच सामाेरी ठेवावी लागते. भक्षक जवळ येताच आर्माडिलाे शरीराची गुंडाळी करून स्वत:चा बचाव करतात.ही गुंडाळी एवढी भक्कम असते, की भक्षकाला या प्राण्याची शिकार करणे श्नय हाेत नाही. आर्माडिलाे प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिका, तसेच उत्तर अमेरिकेत आढळतात. ते वाळवी आणि अन्य कीटकांवर जगतात. हे प्राणी चांगले पाेहणारे असून, श्वास राेखून पाण्याखाली चार ते सहा मिनिटे राहू शकतात.