या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नाेकरी-व्यवसायातून लाभ मिळणार आहे.मित्रांच्या भेटीगाठी हाेऊन नैसर्गिक स्थळी फिरायला जाण्याची याेजना आखू शकता. पत्नीकडूनही फायदा हाेईल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.संसारी जीवनात आनंद अनुभवाल. परिश्रमानुसार बढतीही मिळू शकते.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार हाेण्याची श्नयता आहे. माेठ्या याेजनांवर काम सुरू हाेऊ शकते. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशांतही जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक खर्च प्र्रमाणापेक्षा जास्त वाढेल आणि त्यातील बराचसा भाग वायफळ असेल.
नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबीयांमध्ये जिव्हाळा, समन्वयाची स्थिती आहे. या काळात दांपत्यजीवन काहीसे बाधित राहण्याची श्नयता आहे. या काळात तुमच्या स्वभावातील नैराश्य गृहस्थजीवन प्रभावित करू शकते. या काळात आईवर रागावणे टाळावे.
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या स्वभावात रागाचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे हाेणारा उच्चर्नतदाब व शुगरसंबंधित त्रास आराेग्यावर परिणाम करू शकते.पाेटदुखी आणि गॅस या समस्यांपासून सुटका मिळेल. खाण्या-पिण्यात पाैष्टिकता राहील याची दक्षता घ्यावी. सर्दी असल्यास एक चमचा मधआले खावे.
शुभ दिनांक : 13, 14, 18
शुभरंग : निळा, हिरवा, लाल
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : काेणत्याही गाेष्टीत घाई करू नये,भाैतिक गाेष्टीत मशगूल राहू नये.
उपाय : रविवारी तांबड्या गाईला ओंजळभर गहू खाण्यास द्यावेत. गहू जमिनीवर न टाकता स्वत: भरवावेत. महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघताना गाेड पदार्थ खावा.