दूरवरील लाेकांच्या संदेश व व्यवहारातून लाभ हाेईल. कुटुंबीयांकडून उत्तम सहकार्य लाभेल. मित्रही तुमच्या मदतीला धावून येतील. उत्तम भाेजनाचे याेग आहेत.तुम्ही तुमच्या मधुर बाेलण्याद्वारे काेणाचेही मन जिंकू शकाल. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये मनाेवांछित यश लाभेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्राेत तयार हाेताना दिसत आहेत. अधिकारी व सहकाऱ्यांमुळे तुमच्या याेजना वेळेत पूर्ण हाेऊ शकतील.
ज्येष्ठांचे अनुभव आर्थिक क्षेत्रातील अडचणी कमी करतील. तुमचे श्रम, कार्यकुशलता यामुळे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला घरातील मंडळींसाेबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठाही मिळेल. कार्यक्षेत्रातील त्रास प्रेमसंबंधात अडचणींचे कारण बनू शकते. धार्मिक कामातील रस वाढेल. गैरसमजांमुळे नाती काहीशी प्रभावित हाेऊ शकतात.
आराेग्य : कामातील थकव्यामुळे तुम्ही काहीसे ढीले राहू शकता. पायांसंबंधित समस्या त्रास देऊ शकते. तसेच हवामानाचा परिणामही तुम्हाला सतावण्याची श्नयता आहे. अपचनाची तक्रार असल्यास अन्न गाेड लागणार नाही. माेडाचे वा भिजवलेले शेंगदाणे थाेडा मेथ्या व ओवा मिसळून खावेत.
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : हिरवा, काळा, पिवळा
शुभवार : साेमवार, बुधवार, गुरुवार
दक्षता : मद्यपान टाळावे. शनिवारी शेव्हिंग करू नये.
उपाय : उडीदपीठाच्या 108 गाेळ्या बनवून माशांना खाऊ घालाव्यात.